अलीकडेच कोलकात्याच्या आरजी मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटलमध्ये एका महिला डॉक्टरवर बलात्कार करून तिची हत्या करण्यात आल्याची घटना घडली होती. या घटनेमुळे संपूर्ण देश संतप्त झाला आहे. याचीच सर्वत्र चर्चा होत आहे. दरम्यान, आयुष्मान खुरानाचा एक व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे, ज्यामध्ये तो एक कविता वाचताना दिसत आहे. अभिनेत्याची ही कविता ऐकून कोणाचेही मन दुखेल. प्रशिक्षणार्थी डॉक्टरांसोबत झालेल्या क्रूरतेच्या दरम्यान आयुष्मानने एक कविता वाचली, ज्यामुळे प्रत्येकजण थरथर कापेल.
अलीकडेच आयुष्मान खुरानाने (Ayushman Khurana) त्याच्या अधिकृत इंस्टाग्राम हँडलवर एक व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यामध्ये तो ही कविता वाचताना दिसत आहे. अभिनेत्याची ही कविता सध्या सर्वत्र व्हायरल होत असून या कवितेतील प्रत्येक शब्दाला लोकांनी दाद दिली आहे. अभिनेत्याच्या कवितेचे नाव आहे, काश मैं भी लड़का होती।
मैं भी बिना कुंडी लगाकर सोती, काश मैं भी लड़का होती।
झल्ली बनकर दौड़ती उड़ती सारी रात दोस्तों के साथ फिरती,
काश मैं भी लड़की होती।
कहते सुना है सबको कि लड़की को पढ़ाओ-लिखाओ सशक्त बनाओ।
और जब पढ़-लिखकर डॉक्टर बनती तो मेरी मां ना खोती उसकी आंखों का मोती,
काश मैं भी लड़का होती।
36 घंटे का कार्य दुश्वार हुआ, बहिष्कार हुआ, बलात्कार हुआ, पुरुष के वहशीपन से साक्षात्कार हुआ।
काश! उन पुरुषों में भी थोड़े से स्त्रीपन की कोमलता होती।
काश मैं ही लड़का होती।
कहते हैं सीसीटीवी नहीं था, होता भी तो क्या होता।
एक पुरुष सुरक्षाकर्मी जो उस पर नजर रखता, उसकी नजर भी कितनी पाक होती?
काश में एक लड़का होती।
अगर मैं एक लड़का होती शायद आज मैं भी जिंदा होती।
View this post on Instagram
शुक्रवारी ९ ऑगस्ट रोजी रुग्णालयाच्या सेमिनार हॉलमध्ये एका महिला पीजीटी डॉक्टरचा मृतदेह सापडला होता. ती गुरुवारी रात्री ड्युटीवर होती. शवविच्छेदन अहवालात तिची हत्या करण्यापूर्वी एकापेक्षा जास्त जणांनी तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याचे समोर आले आहे.
दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
हेही वाचा –
राजकुमारने पहिल्या पगारातून खरेदी केला होता किराणा सामान, मिळाले होते इतके पैसे
शाहरुखची एक झलक पाहण्यासाठी रस्त्यात उभी होती शर्वरी बघ, अभिनेत्रीने केला एक मजेशीर खुलासा