अभिनेता राजकुमार राव (Rajkumar Rao) याने त्याच्या अभिनयाने सगळ्यांच्या मनावर अधिराज्य गाजवले आहे. मात्र, तो बऱ्याच दिवसांपासून हिट चित्रपटाच्या शोधात होता. त्याचे मागील अनेक चित्रपट चांगले प्रदर्शन करू शकले नाहीत आणि प्रेक्षकांना आकर्षित करण्यात पूर्णपणे यशस्वी ठरले नाहीत. आता ‘स्त्री 2’ या हिट चित्रपटाची त्याची प्रतीक्षा संपणार असल्याचे दिसते आहे. तो चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये कोणतीही कसर सोडत नाही आणि या संदर्भात, तो अलीकडेच झाकीर खानच्या शोमध्ये दिसला, जिथे त्याने त्याच्या कारकिर्दीच्या सुरुवातीच्या दिवसांबद्दल मनोरंजक गोष्टी सांगितल्या.
झाकीर खानच्या ‘आपका अपना झाकीर में स्त्री 2’ या शोमध्ये राजकुमार राव आणि श्रद्धा कपूर यांना त्यांचा पहिला पगार किती होता आणि त्याने तो कुठे खर्च केला असा प्रश्न विचारण्यात आला. प्रत्युत्तरात, राजकुमारने सांगितले की त्याला त्याच्या पहिल्या कामासाठी 300 रुपये मिळाले होते, ज्यातून त्याने किराणा सामान विकत घेतला.
ही घटना हायस्कूलच्या काळात घडल्याचे राजूकमार यांनी सांगितले. त्या काळात तो एका मुलीला डान्स शिकवायचा आणि त्यासाठी त्याला 300 रुपये दिले जायचे, त्यानंतर राजकुमारने किराणा सामान विकत घेतला आणि जेव्हा त्याच्याकडे थोडे पैसे शिल्लक होते तेव्हा त्याने देसी तूपही विकत घेतले. त्या काळात तुपासह रोटी खाणे ही त्यांच्या कुटुंबात मोठी गोष्ट होती, अशी आठवण अभिनेत्याने सांगितली. श्रद्धा कपूरने सांगितले की, ती अमेरिकेत राहत असताना एका कॉफी शॉपमध्ये काम करायची आणि तिला पहिला पगार 40 डॉलर मिळाला. श्रद्धाने तिची पहिली कमाई खाण्यापिण्यावर खर्च केली.
दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
हेही वाचा –
‘स्त्री 2’ला मिळालेल्या प्रतिसादाने श्रद्धा कपूर गेली भारावून, अभिनेत्रीने दिली अशी प्रतिक्रिया
‘कलाकार बनून अश्लीलतेला प्रोत्साहन देऊ नका’, कंगना रणौतची स्वातंत्र्य दिनानिमित्त खास पोस्ट