‘पठाण‘ चित्रपटातील ‘बेशरम रंग‘ या गाण्याद्वारे दीपिका पदुकोण जेव्हा समोर आली, तेव्हा तिचा रंग सर्वत्र दिसत होता. दीपिकाच्या किलर मूव्हमुळे हे गाणे इतके हिट झाले आहे की, आता कोरियन बँड बीटीएसनेही त्यावर डान्स केला आहे. या गाण्यावर कोरियन बँडच्या सदस्यांनी जबरदस्त रंगत दाखवली. दीपिकापेक्षा बीटीएसची शैली अधिक किलर दिसत आहे आणि चाहत्यांना ती खूप आवडली देखील आहे.
कोरियन बँड (Korean Band) बीटीएसचे (BTS) फॅन फॉलोइंग जगभरात आहे आणि त्यांचे डान्सिंग व्हिडिओही चाहत्यांमध्ये लोकप्रिय आहेत. मात्र, जेव्हापासून त्यांचा ‘पठाण’मधील ‘बेशरम रंग’ या गाण्याचा व्हिडिओ समोर आला आहे, तेव्हापासूनच खळबळ उडाली आहे, पण बीटीएस आर्मीने दीपिकाच्या गाण्यावर डान्स केलेला नाही. वास्तविक, एका चाहत्याने ही क्रिएटिविटी बीटीएसच्या डान्स व्हिडिओद्वारे दाखवली आहे.
View this post on Instagram
जेव्हा ‘हम तो लूट लिया मिल के…’ वरील बीटीएस चा व्हिडिओ समोर आला, तेव्हा असे दिसले की, ते या गाण्यावर नाचत आहेत. मात्र, हा एक एडिटेड व्हिडिओ हाेता, ज्यामध्ये एका चाहत्याने क्रिएटिविटी दाखवली आणि बीटीएस सदस्यांना ‘बेशरम रंग’ वर नृत्य करायला लावले. सध्या, लोक हा व्हिडिओ खूप पसंत करत आहेत आणि कमेंट्स सेक्शनमध्ये हार्ट इमोजी देखील शेअर करत आहेत.
एका युजरने सांगितले की, “BTS मधील ‘B’ म्हणजे बॉलीवूड कारण, प्रत्येक बॉलीवूड गाणे त्यांच्या नृत्याला अनुकूल आहे.” त्याच वेळी, एकाने असेही म्हटले की, “हे व्हर्जन दीपिकापेक्षा चांगले आहे.”
View this post on Instagram
‘पठाण’ या चित्रपटात शाहरुख खान आणि दीपिका पदुकोणसोबत जॉन अब्राहम देखील दिसणार आहेत. 25 जानेवारी 2023 ला हिंदी, तमिळ आणि तेलुगूमध्ये प्रदर्शित होणाऱ्या या चित्रपटासाठी चित्रपटगृहांचे बुकिंग आधीच सुरू झाले आहे.( korean band bts members dances on actress deepika padukone beshram rang shared by a fan)
दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
‘स्वत:ला बदलण्याची वेळ आहे’! अमृता फडणवीस यांच्या विधानावर केतकी चितळेची टीका
काम्या पंजाबीने सुंबुलला पाठिंबा देत साजिद खानला लावली फटकार म्हणाली, ‘बाहेर वेगळं आणि घरामध्ये वेगळंच….’