काय सांगता! अभिनेत्रीने चक्क तीन तासात वाढवले १५ किलो वजन; खोटं वाटतंय? मग पाहा हा व्हिडिओ


कलाकार आणि त्यांचे फिटनेस प्रेम हे तर सर्वश्रुत आहे. मनोरंजन क्षेत्रात काम करायचे असेल आणि टिकायचे असेल तर कलाकरांना त्यांची फिटनेस जपावीच लागते. फिटनेसची क्रेझ अभिनेत्रींमध्ये किंचित जास्तच दिसून येते. नेहमी अभिनेत्री त्यांचे फिटनेसचे व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट करत असतात. डायट, योगा, जिम आदी पद्धतीने अभिनेत्री स्वतःला फिट ठेवतात. मात्र कधी कधी कलाकारांना त्याच्या भूमिकेसाठी वजन वाढवावे देखील लागते. वजन वाढवण्यासाठी देखील काही वेळ जाऊ द्यावा लागतो. लगेच कधीच वजन वाढत नाही आणि तीन तासात तर नाहीच नाही. मात्र अभिनेत्री क्रिती खरबंदाने चक्क तीन तासात तिचे १५ किलो वजन वाढवले आहे. कसे ते जाणून घेण्यासाठी वाचा पुढची बातमी.

क्रितीने तिच्या इंस्टा अकाऊंटवर एक व्हिडिओ पोस्ट केला आहे. या व्हिडिओमध्ये सुरुवातीला ती एका जाड जॅकेटमध्ये आणि साध्या कपड्यांमध्ये दिसत आहे. ती वजन करण्याच्या काट्यावर उभी राहते आणि वजन करते तेव्हा तिचे वजन ४५ किलो दिसते. त्यानंतर ती अतिशय सुंदर वधूच्या वेशात तयार होऊन येते आणि पुन्हा वजन करते तर तिचे वजन ५५/५७ किलो दिसते. (kriti kharbanda gain 15 kg weight in 3 hours)

 

हा व्हिडिओ पोस्ट करताना क्रितीने लिहिले, “तीन तासात १५ किलो वजन कसे वाढवायचे, व्हिडिओमध्ये बघा.” सोबतच तिने काही हसणाऱ्या ईमोजी देखील पोस्ट केल्या आहेत. हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत असून, त्यावर फॅन्सच्या भन्नाट कमेंट्स देखील येत आहे.

या व्हिडिओवर एकीकडे तिचे कौतुक होत असताना दुसरीकडे तिला तिच्या गणिताच्या ज्ञानावरून ट्रोल केले जात आहे. कारण काट्यावर तिचे वाढलेले वजन १०/१२ किलोच दिसत आहे. त्यामुळे नेटकरी तिला गणिताचा अभ्यास करण्यास सल्ला दिला आहे.

क्रिती सध्या तिच्या आगामी ‘१४ फेरे’ सिनेमासाठी चर्चेत आली आहे. हा सिनेमा झी 5 वर प्रदर्शित होणार असून यात तिच्यासोबत विक्रांत मेस्सी दिसणार आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

कार्तिक आर्यनच्या नव्या चित्रपटाची घोषणा; आता पायलट बनून अभिनेता जिंकणार रसिकांची मनं

राज कुंद्रा प्रकरणात शिल्पा शेट्टीचा ‘हंगामा २’ झाला प्रदर्शित; चित्रपटावर होणार परिणाम?

‘आयुष्यभर तुरुंगात सड’ म्हणत राज कुंद्रावर आरोप लावणारी पुनीत कौर नक्की आहे तरी कोण? वाचा


Leave A Reply

Your email address will not be published.