Thursday, June 1, 2023

काय सांगतो घायाळ करणाऱ्या अदांची अभिनेत्री क्रिती सेननचा #MondayMood, वाचा

बॉलिवुड अभिनेत्री क्रिती सेनन (Kriti Sanon) मोठ्या पडद्यावर जितकी सुंदर दिसते, तितकीच ती वैयक्तिक आयुष्यातही स्‍टाइलिश आणि सुंदर आहे. आपले आगळे व्यक्तिमत्व आणि परफेक्ट फिटनेसमुळे फॅशन इंडस्ट्रीतही तिला खास डिमांड आहे. क्रिती सोशल मीडियावरही अतिशय सक्रीय असणाऱ्या अभिनेत्रींपैकी एक आहे. आपल्या लक्षवेधी पोस्ट्समधून चाहत्यांना आकर्षित करण्यात ती कसलीच कसर सोडत नाही.

वीकेंडनंतरचा सोमवार बहुतेकांसाठी अगदीच कंटाळवाणा असतो. मात्र क्रितीचे याच्या उलट आहे. तिने आपला आनंदी मंडे मूड चाहत्यांसोबत शेअर केला आहे. हे करताना तिने चाहत्यांना एकदम अनोख्या जगात नेले आहे. या अभिनेत्री आज स्वदेशी मायक्रो-ब्लॉगिंग मंच ‘कू’वर एक वीडियो शेयर करताना लिहिले, “शायद मेरा #MondayMood ऐसा है।” या व्हीडियोमध्ये ती डोंगरांमध्ये तयार केलेल्या एका टूरिस्ट पुलवर उभी आहे.

इथे क्लिक करून बघा व्हीडिओ 

क्रितीने मागच्या काही काळात इंडस्ट्रीत आपली ८ वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने फिटनेसच्या क्षेत्रात पाऊल ठेवले आहे. तिने फिटनेस कम्यूनिटीत गुंतवणूक करत ‘द ट्राइब’ नावाचा ब्रॅंड लॉन्च केला आहे. याबाबत क्रितीने सोशल मीडियाच्या माध्यमातून याची माहिती दिली आहे. आपले सौंदर्य आणि निरागस हास्याच्या माध्यमातून लोकांच्या मनावर राज्य करणाऱ्या क्रितीला तिचे चाहते केवळ बॉक्‍स ऑफिसच नाही, तर सोशल मीडियावरही भरभरून फॉलो करतात. ३१ वर्षीय ग्लॅमरस क्रितीला प्रत्येक प्रकारचे आउटफिट्स खूप शोभून दिसतात.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा

हे देखील वाचा