इस्रायल आणि पॅलेस्टाईनमध्ये सुरू असलेल्या युद्धादरम्यान बॉलीवूड अभिनेत्री नुसरत भरुच्चा (nusarat bharucha) इस्रायलमध्ये अडकली होती. नुसरत हायफा फिल्म अवॉर्ड्समध्ये सहभागी होण्यासाठी इस्रायलला गेली होती. मात्र, अभिनेत्री आता भारतात सुखरूप परतली. या संपूर्ण प्रकरणावर स्वत:ला टीकाकार म्हणवणाऱ्या कमाल आर खान उर्फ केआरकेने नुसरत भरुचावर निशाणा साधला आहे.
कमाल आर खान सोशल मीडियावर अनेकदा बॉलिवूड सेलिब्रिटींना टार्गेट करत असतो. केआरकेने आता नुसरत भरुचा इस्रायलमध्ये अडकून भारतात परतल्याच्या संपूर्ण घटनेवर निशाणा साधला असून याला नाटक म्हटले आहे.
KRRK ने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X (पूर्वी ट्विटर म्हणून ओळखले जाणारे) वर लिहिले, “नुसरत भरुचा शनिवारीच भारतात परतली. मात्र रविवारी सकाळी तिने इस्रायलशी संपर्क तुटल्याची बातमी दिली. एक तासानंतर तिने माहिती दिली की ती सुरक्षित आहे आणि विमान पकडण्यासाठी विमानतळावर पोहोचत आहे. तासाभरानंतर तिने एक व्हिडीओ जारी केला की ती मुंबईला पोहोचली आहे. आता तुम्ही कल्पना करू शकता की ती किती मोठी नाटकी आणि निर्लज्ज आहे.”
इस्रायलमधून भारतात सुखरूप पोहोचलेल्या नुसरत भरुचाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. व्हिडिओमध्ये अभिनेत्री एअरपोर्टमधून बाहेर पडताना दिसत आहे. मात्र, या व्हिडिओमध्ये अभिनेत्री खूपच नाराज दिसत आहे. यावेळी नुसरतला पाहताच मीडियाने तिला घेरले.हे पाहून अभिनेत्री चांगलीच घाबरली आणि तिच्या डोळ्यात अश्रूही आले. ,
दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
हेही वाचा-
‘जवान’चे यश शाहरुख खानसाठी ठरले अडचणीचे, Y+ सुरक्षासह तैनात कमांडो शस्त्रास्त्रांनी सज्ज
आई श्वेतामुळे पलक तिवारी बनली अभिनेत्री? खुद्द अभिनेत्रीने केले ‘हे’ गुपित उघड