कलाकार नेहमीच सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांच्या पोस्ट शेअर करताना त्यांच्या मनातील भावना देखील व्यक्त करताना दिसतात. कलाकार आणि फॅन्स यांच्यामधील दुवा म्हणून सोशल मीडिया महत्वाचे काम करते. या माध्यमातून कलाकार नेहमीच विविध पोस्ट शेअर करत चाहत्यांच्या संपर्कात राहतात. मराठी इंडस्ट्रीमधील कलाकार देखील सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात सक्रिय असून अनेकदा ते त्यांच्या वैयक्तिक, व्यायसायिक आयुष्यातील महत्वाच्या घटनांची, गोष्टींची माहिती देताना दिसतात. अमाप लोकप्रिय आणि प्रसिद्ध असणारा अभिनेता विनोदवीर कुशल बद्रिके देखील नेहमीच सोशल मीडियावर सक्रिय दिसतो. तो नेहमीच त्याच्या आयुष्यातील विविध गोष्टींबद्दल मनमोकळे पण लिहितो आणि सर्वांसोबत ते शेअर करतो. कुशलच्या पोस्ट देखील नेहमीच चर्चेचा विषय ठरतात. आता पुन्हा एकदा कुशल त्याच्या एका पोस्टमुळे चांगलाच गाजताना दिसत आहे.
नुकतीच कुशलने त्याच्या सोशल मीडिया अकाऊंटवरून एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमधून त्याने स्वप्ना पवार या व्यक्तीला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. कुशलने शेअर केलेल्या पोस्टमध्ये त्याने लिहिले, “कधीकधी एकाच नात्यात असंख्य नाती दडलेली असतात, बघना कधीकधी मुलांची काळजी घेता घेता तू माझी सुद्धा “आई” होतेस, कधी तुझ्या बहिणी सोबत माझी सुद्धा “बहिण” होतेस, कधी मला, तू माझी “मुलगी” असल्यासारखी तुझी काळजीच वाटू लागते, “नात्याच्या प्रत्येक पदराला वेगळी भावना जोडलेली असते” नाहीका ? छे आपलं नातं या सगळ्याच्या पल्याड आहे तू “मैत्रीण” आहेस माझी,yes a perfect phrase for various relations, माझ्या जगातल्या सगळ्यात सुंदर आणि Brave मैत्रिणे तुला happy birthday.”
स्वप्ना पवार ही कुशलची पत्नी असलेल्या सुनयनाची बहीण असून, ती आणि कुशल यांच्यामध्ये खूपच चांगला बॉण्ड आहे. सध्या कुशलची ही पोस्ट चांगलीच व्हायरल होत असून, त्यावर नेटकऱ्यांच्या देखील कमेंट्स येत आहेत. चला हवा येऊ द्या या शोमधून कुशल बद्रिके हा नेहमीच प्रेक्षकांचे मनोरंजन करत असतो. या शोच्या मंचावर कुशलने आजपर्यंत अनेक भूमिका केल्या. विनोदाचे अचूक टायमिंग आणि सहजसुंदर अभिनय यामुळे कुशलने विनोदी अभिनेत्यांच्या पंक्तीत खास जागा मिळवली आहे. विनोदी अभिनयाबरोबरच कुशल गंभीर भूमिका करण्यातही बाप आहे.
दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
- हेही वाचा-
- बहुप्रतिक्षित भूलभुलैय्या २ सिनेमाचा टिजर अखेर प्रदर्शित, अक्षय कुमारच्या भूमिकेत छाप पाडतोय ‘हा’ अभिनेता
- हिंदी आणि दाक्षिणात्य चित्रपटसृष्टी गाजवणाऱ्या ‘या’ अभिनेत्रीने वयाच्या अवघ्या २१ व्या वर्षी घेतला होता जगाचा निरोप
- आंबेडकर जयंती: जातीय व्यवस्थेवर भाष्य करणाऱ्या ‘या’ चित्रपटांनी दाखवले समाजातील भीषण सत्य