बॉलिवूडमधाल प्रसिद्ध गायिका प्रतिभा सिंग बघेल हिने ‘मणिकर्णिका‘, ‘जिद‘, ‘हम्टी शर्मा की दुल्हनिया‘ सारख्या गाजणाऱ्या चित्रपटामध्ये तिने गाणे गायले आहेत. ती नुकतंच प्रसिद्ध सांगितकार आलोक श्रीवास्तव यांचं नवीन गाणं ‘क्या कीजे’ एक म्युजिक अल्बम सोबत दोघेही एकत्र आले आहेत. या गाण्याचा नवीन अल्बम (दि, 7 डिसेंबर) रोजी प्रर्शित होणार आहे.
प्रसिद्ध गायिका प्रतिभा सिंग बघेल (Pratibha Singh Baghel) आणि संगितकार आलोक श्रीवास्तव (Alok Shrivstav) यांचा नवीन अल्बम नुकतंच प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे. याचे संगित गौरव वासवानी आणि कंपोज घनश्याम वासवानी यांनी केले आहे. क्या कीजे हे गाणं वेद गुप्ता द्वारे स्थापित आणि ‘बीईके म्यूजिक’ द्वारे प्रदर्शित करण्यात आलं आहे. या अल्बमचा प्रदर्शित कार्यक्रम दिल्लीमध्ये आयोजित केला असून प्रतिभा सिंग बघेल, आलोक श्रीवास्तव, अभिनेता राजेश तैलंग सोबतच अनेक लाकार उपस्थित होते.
क्या कीजे गाण्याबद्दल सांगत असताना प्रतिभा यांनी सांगितले की, “आलोक श्रीवास्तव लिखित बज्म-ए-खास वर रिलीज होणारे हे एक नवीन सिंगल आहे. ‘क्या कीजे’ ची संपूर्ण कल्पना इतकी प्रेमाने भरलेली आहे की, मला ते गाणे भाग पडले.” यानंतर गीतकार आलोक श्रीवास्तव यांनी आपले मनोगत व्यक्त करत सांगितले की, “मी घनशाम वासवानी यांच्याशी जवळपास ३० वर्षांपासून जोडलेलो आहे, त्यामुळे त्यांच्यासोबत काम करणे हा माझ्यासाठी भावनिक क्षण होता. तसेच प्रतिभा सिंग यातर उत्कृष्ट कलाकार आहेतच. त्याच्यासोबतच निर्माता वेद गुप्तासोबत काम करताना मला खूप आनंद होत आहे. वेद गुप्ता हे कला, संस्कृती आणि साहित्याला महत्त्व देतात आणि कलाकारांना त्यांचा पाठिंबा अतुलनीय आहे. अशा अप्रतिम टीमसोबत काम करताना खूप आनंद झाला. तर, गौरव वासवानी हे इंडस्ट्रीतील टॉप संगीत निर्मात्यांपैकी एक आहेत.
म्युजिक कंपोजर घणश्याम वासावानी (Ghanshyam Vaswani) यांनी सांगितले की, ‘क्या कीजे’ ही आलोक जी यांनी लिहिलेली एक सुंदर गझल आहे, जी माझ्या हृदयाला भिडली, म्हणून मी ती बनवण्याचा निर्णय घेतला. प्रतिभासिंग बघेल यांचा आवाज म्हणजे ‘सेनेपे सुहागा’ आहे. बज्म-ए-खासचे निर्माते आणि संस्थापक वेद गुप्ता सांगातात, ‘या गझलची कथा एका मुलीच्या अपूर्ण प्रेमाची आहे. यामध्ये आलोक श्रीवास्तव आणि प्रतिभा सिंह यांनी उत्तम काम केले आहे. अशाप्रकारे अनेक कलाकारंच्या आणि संगितकारांच्या हजेरीमध्ये हा कार्यक्रम चांगल्या प्रकारे पार पडला.
दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सऍप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
ही तर हाईटच झाली! प्रमोशन करण्यासाठी थेट अभिनेत्रीच्या पायात पडला प्रसिद्ध दिग्दर्शक
चित्रपटांमध्ये बिकिनी घालणाऱ्या पहिल्या अभिनेत्री होत्या शर्मिला टागोर, बोल्ड इमेजने लावली होती थेट संसदेपर्यंत आग