Friday, March 29, 2024

देशाच्या चोरांना पकडणार सुष्मिताच्या प्रेमात पडलेले ललित मोदी; म्हणाले, ‘भारत सरकारने संधी दिली तर…’

बॉलीवूड अभिनेत्री सुष्मिता सेन आणि उद्योगपती ललित मोदी यांनी त्यांच्या नात्याची घोषणा केल्यापासून ते चर्चेत आहेत. ललित मोदींनी जेव्हा सोशल मीडियावर स्वतःचे आणि सुष्मिताचे रोमँटिक फोटो शेअर केले, तेव्हा ते पाहून लोक भडकले होते. दोघांच्या डेटींगच्या बातम्यांसोबतच ललित मोदीचे मनी लाँड्रिंग प्रकरणही चर्चेत आले होते, ज्यावर लोक सोशल मीडियावरून आपली मते व्यक्त करत आहेत. त्याचवेळी आता ललित मोदींनी एक पोस्ट शेअर केली आहे की, ज्यामध्ये त्यांनी पैसे घेऊन पळून गेलेल्या लोकांकडून पैसे कसे काढता आले असते हे सांगितले आहे. सरकारचा पैसा तो परत आणू शकतो, असे त्यांचे म्हणणे आहे.

ललित मोदी (Lalit Modi) यानी त्यांच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक नोट शेअर केली आहे. ज्यामध्ये तुम्ही बोलणार नसाल तर जगाला तुमचे अस्तित्व कसे कळेल, असे लिहिले आहे. या नोटसोबतचं ललित मोदींनी दिलेले कॅप्शन चर्चेत आहे. ललित मोदींनी लिहिले की, बदमाशांना खाली आणण्याची वेळ आली आहे. जर भारत सरकारने मला काही काम दिले असते तर कदाचित मला सुमारे एक ट्रिलियन डॉलर्स परत मिळाले असते. मला लाच दिली जाऊ शकत नाही.

 

View this post on Instagram

 

या कॅप्शनमध्ये ललित मोदींनी सोशल मीडिया वापरकर्त्यांना त्यांच्या टेलिग्राम अकाऊंटबद्दलही सांगितले जे सार्वजनिक आहे. या ग्रुपमध्ये लोक ललित मोदी आणि सुष्मिता सेनसाठी सहज पोस्ट करु शकतात. याबाबत माहिती देताना ललित मोदींनी लिहिले की, हे इन्स्टाग्रामवर मोफत आहे. तुम्ही नकारात्मक कथा पोस्ट करण्यास देखील मोकळे आहात. ललित मोदी आणि सुष्मिता सेन (Sushmita Sen)यांना त्यांच्या नात्यामुळे खूप ट्रोल करण्यात आले होते.

ललित मोदींनी १४ जुलै रोजी ट्विटरवर एका पोस्टद्वारे सुष्मिता सेनसोबतच्या नात्याची घोषणा केली होती. एका ट्विटमध्ये त्याने अभिनेत्रीला आपला बेटर हाफ असे वर्णन केले होते, त्यानंतर लोकांनी दोघांचे लग्न झाल्याचा अंदाज लावला होता. मात्र, नंतर दुसऱ्या एका पोस्टमध्ये मोदींने हे दोघे सध्या एकमेकांना डेट करत असून लवकरच लग्न करणार असल्याचे स्पष्ट केले.

दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सऍप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

हेही वाचा-

गरजूंसाठी देवदूत ठरतोय सोनू सूद, मदतीसाठी रोज येतात ४० हजार…

‘मला चंद्राची उपमा देणारी ती आज…’ आईच्या निधनानंतर अभिनेत्याची भावुक पोस्ट चर्चेत

अभिनेत्याच्या निधनानंतर पत्नीवर मोठं संकट, ‘एवढ्या’ लाखांच्या कर्जाखाली दबलंय दीपेश भानचं कुटुंब

हे देखील वाचा