Tuesday, March 5, 2024

‘रामायण’मध्ये लारा दत्ता साकारणार ‘ही’ महत्वपूर्ण भूमिका, देओल ब्रदर्सची देखील होणार एंट्री

रामायणमध्ये(Ramayan) लारा दत्त(Lara duta) साकारणार कैकेयीची भूमिका, सनी देओल(Sunny deol) आणि बॉबी देओल यांच्या(Bobby deol) सुद्धा महत्वाच्या भूमिका असणार. दिगदर्शक नितीश तिवारीने फिल्मची घोषणाकेल्या पासुनच फिल्मची आणि फिल्ममधे कोणते कलाकार असतीलयाची चर्चा होती. अश्यातच एका रिपोर्टनुसार लारा दत्त,सनी देओल आणि बॉबी देओलचे नाव समोर येत आहे.

गेल्या अनेक दिवसांपासून दिगदर्शक नितीश तिवारीच्या (Nitish Tiwari) रामायण फिल्मची चर्चा होती. फिल्मची घोषणाकेल्या पासुनच फिल्मच्या कास्टबद्दल अनेक कलाकारांची नावे समोर येत होती. रिपोर्टनुसार लारा दत्त,सनी देओल आणि बॉबी देओलची फिल्ममधे महत्वाच्या भूमिका असणार आहेत अशी माहिती समोर येत आहे.

रामायणमध्ये लारा दत्त
माध्यमांच्या रिपोर्टनुसार, रामायणमध्ये राणी कैकेयीच्या भुमिकेसाठी अभिनेत्री लारा दत्तशी संपर्क केला जात आहे. भारतीय इतिहासातल्या सर्वात मोठ्या कथेतली पात्रे उत्तम साकारु शकतात अश्या कलाकारांना फिल्मसाठी साइन करण्याची इच्छा दर्शवली आहे. दिगदर्शक नितीश तिवारीला अभिनेत्री लारा दत्त राणी कैकेयीच्या भुमिकेसाठी योग्य वाटते.

रामायणमध्ये देओल ब्रदर्सची एन्ट्री
अभिनेता सनी देओलशी हनुमानाच्या भुमिकेसाठी चर्चा केली असल्याची माहीती आहे. ही चर्चा अंतिम टप्पात असली तरी याबद्दल अजुन कोणतेही स्पष्टता नाही. तर अभिनेता बॉबी देओलशी कुंभकर्णाच्या भुमेकेसाठी चर्चा सुरु आहे. बॉबी देओलया फिल्ममध्ये असणार आहे की नाही हे अजुन निश्चीत नाही. एनिमलच्या(Animal) यशानंतर,बॉबी देओलकडे अनेक फिल्मच्या ऑफर आहेत.

मार्चमध्ये होणार शुटींग
रणबीर कपूर या फिल्ममाध्ये रामाची भुमिका साकारणार आहे. दिगदर्शक नितीश तिवारी फिल्मच्या पहिल्या शेड्युलमध्ये रणबीर कपूरसोबत(Ranbir kapoor) शुटींग करणार आहे. तर, साई पल्लवी(Sai pallavi) सीतेची भुमीका साकारणार आहे. यश रावणाची भुमिका साकारणार आहे. रामायणची शुटींग मार्चमध्ये सुरू होऊ शकते. रामायणही फिल्म २०२५ मध्ये रिलीज होणार असल्याचे सांगितले जात आहे.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा-

बिगबाॅस 17चं ‘चप्पल पुराण’ घेतय नवं वळण, विक्कीचे वडील अंकिताच्या आईला म्हणाले, ‘लायकी काय आहे…’
‘मी मोदींचा टीकाकार असल्यामुळे अनेक पक्ष मला उमेदवार बनवू इच्छितात’, प्रकाश राज यांचा मोठा दावा

हे देखील वाचा