Thursday, March 28, 2024

बाबो! एक, दोन नव्हे; तब्बल 27 वर्ष थिएटरमध्ये गाजले ‘हे’ चित्रपट

बॉलिवूडचे चित्रपट बऱ्याच दिवसांपासून फ्लॉप होत आहेत. हिंदी सिनेमाचा सध्याचा काळ बॉक्स ऑफिसवर फारसा चांगला चालू नाही. या दिवसांमध्ये अर्थातच चित्रपटगृहांमध्ये पॅन इंडिया स्तरावर प्रदर्शित झालेला ‘ब्रह्मास्त्र‘(Brahmastra) चित्रपट राज्य करत आहे. आलिया भट्ट(Alia Bhatt) आणि रणबीर कपूर(Ranbir kapooR) याच्या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर येताट धुमाकूळ घातला. पण याआधी प्रदर्शित झालेले बहुतांश हिंदी चित्रपट काही दिवसातच चित्रपटगृहात उतरताना दिसले. त्यात आमिर खान आणि अक्षय कुमरसारख्या कलाकाऱ्यांच्या चित्रपटांचाही समावेश आहे. पण बॉलिवूडमध्ये असे काही चित्रपट देखील बनले आहेत ज्यांनी प्रदर्शित झाल्यानंतर पडद्यावर जास्त काळ राहण्याचा जबरदस्त विक्रम केला आहे. यातील काही चित्रपट पाच-तीन वर्षे चित्रपटगृहात होते.

दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे
‘दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे’ न पाहिलेला बॉलिवूड रसिक प्रेक्षकांमध्ये क्वचितच कोणी असेल. 1995 मध्ये प्रदर्शित झालेल्या या चित्रपटात शाहरुख खान आणि काजोलच्या केमिस्ट्रीने सर्वांची मने जिंकली होती. चित्रपटाच्या कथेपासून ते गाण्यांपर्यंत आजही प्रेक्षकांना ते आवडते आणि गेल्या 27 वर्षांपासून हा चित्रपट आजही मुंबईतील मराठा मंदिर चित्रपटगृहात प्रेक्षकांच्या भेटीला येतो. सकाळी साडेअकरा वाजता हा शो दाखवण्यात आला आहे.

शोले
रमेश सिप्पी दिग्दर्शित ‘शोले’ हा चित्रपट आजही प्रेक्षकांमध्ये खूप लोकप्रिय आहे आणि या चित्रपटाने रिलीजच्या वेळीही खळबळ उडवून दिली होती. अमिताभ बच्चन, धर्मेंद्र, हेमा मालिनी, संजीव कुमार, अमजद खान आणि जया बच्चन यांसारख्या कलाकारांनी सजलेला हा चित्रपट चांगलाच गाजला. चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर 286 आठवड्यांपेक्षा जास्त काळ (पाच वर्षे) थिएटरमध्ये राहिला.

किस्मत
ज्ञान मुखर्जी दिग्दर्शित ‘किस्मत’ या चित्रपटाचे नावही या यादीत सामील आहे. या चित्रपटात अशोक कुमार, मुमताज शांती आणि शाह नवाज यांच्या प्रमुख भूमिका होत्या. चित्रपट 187 आठवडे म्हणजे जवळपास तीन वर्षे थिएटरमध्ये चालला.

मुघल-ए-आझम
मुघल-ए-आझम हा हिंदी चित्रपटसृष्टीतील सर्वात लोकप्रिय चित्रपटांपैकी एक आहे, जो रिलीजच्या विक्रमी वेळेनंतर थिएटरमध्ये राहिला. पृथ्वीराज कपूर, दिलीप कुमार आणि मधुबाला स्टारर चित्रपट जवळपास 150 आठवडे थिएटरमध्ये चालू होता.

बरसात
राज कपूर दिग्दर्शित ‘बरसात’ हा चित्रपट दोन वर्षांहून अधिक काळ थिएटरमध्ये चालला. या चित्रपटात राज कपूर, नर्गिस आणि प्रेमनाथ यांच्या महत्त्वाच्या भूमिका होत्या.

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही नक्की वाचा-
पैसे देवूनही चित्रपटात केले नाही काम, ‘या’ दिग्गज दिग्दर्शकाने सनी देओलवर लावला फसवणुकीचा आरोप

‘ब्रम्हास्त्र’ चित्रपटाच्या यशाने अयान मुखर्जी खूश, ‘ब्रम्हास्त्र 2’ ची केली घोषणा, पाहा कधी होणार प्रदर्शित?
‘या’ चित्रपटांची ऑफर धुडकावून रणबीरने केली घोडचूक, बॉक्स ऑफिसवर ठरले सुपरहिट

हे देखील वाचा