Monday, May 13, 2024

‘आई कुठे काय करते’मधील अरुंधतीच्या अदांनी चाहत्यांना केले घायाळ, व्हिडिओ झाला व्हायरल

मराठी सिनेसृष्टीतील छोट्या पडद्यावरील ‘आई कुठे काय करते‘ (aai kuthe kay karate)ही एक ट्रेडिंग मालिका आहे. या मालिकेतील प्रत्येक पात्र लेखकाने उत्कृष्टरित्या रेखाटले आहे. तसेच मालिकेची कहाणी देखील खूप वेगळी आणि वास्तविक आहे. मालिकेची खासियत म्हणजे मालिकेतील प्रत्येक पात्राला त्याची एक विशेष ओळख आणि स्थान आहे.

यातील मुख्य भूमिकेत असणारी अरुंधती म्हणजेच अभिनेत्री मधुराणी गोखले (madhurani gokhale)हिचा अभिनय प्रेक्षकांना खूप आवडत आहे. मालिकेतील तिच्या समंजस आणि विचार पात्राचे सर्वत्र कौतुक होत आहे. त्यामुळे सोशल मीडियावर तिचा चाहता वर्ग चांगलाच वाढला आहे. आजकाल सोशल मीडियावर देखील ती मोठ्या प्रमाणात सक्रिय असते. अशातच तिचा आई कुठे काय करते या मालिकेच्या सेटवरील एक व्हिडिओ समोर आला आहे.

या व्हिडिओमध्ये आपण पाहू शकतो की, तिने सुंदर अशी गुलाबी रंगाची साडी नेसली आहे. या व्हिडिओमध्ये ती रोमँटिक अंदाजात घायाळ करताना दिसत आहे. ‘फिर छिड़ी रात बात फूलों की…’ ही गझल देखील वाजाताना दिसत आहे. ज्यावर ती वेगवेगळे हावभाव देताना दिसत आहे. तिच्या चाहत्यांना देखील तिचा हा व्हिडिओ खूप आवडला आहे. अनेकजण तिच्या या व्हिडिओवर कमेंट करून तिचे कौतुक करत आहेत.

मधुराणीची लोकप्रियता आजकाल खूप वाढली आहे. तिचे पात्र घराघरात पोहचले आहे. त्यामुळे ती सगळ्यांना आवडत आहे.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा-

हे देखील वाचा