Thursday, November 30, 2023

तुम्ही पाहिलेत का? बॉलिवूडमध्ये जुण्या कलाकारांनीही बिंधास्त दिलेत किसींग सीन, बघा व्हिडिओ

हल्ली कोणतीही सिनेसृष्टी घ्या, त्यातील जवळपास सर्वच सिनेमात इंटिमेट सीन हे असतातच असतात… आणि प्रेक्षक अशाच गोष्टींकडे आकर्षित होऊन तो सिनेमा पाहतातच. आता तर भर पडलीय ती म्हणजे ओटीटी प्लॅटफॉर्मवरील असंख्य वेबसीरिज आणि सिनेमांची… या ओटीटी प्लॅटफॉर्मला ना कोणता सेन्सॉर बोर्ड आहे, ना कुणी विचारणारं आहे. आता तुम्ही म्हणाल की, अशा कोणत्या वेबसीरिज आहेत… जर तुम्ही ओटीटी प्लॅटफॉर्मवरील कोणत्याही ऍपवर गेलात, तर तुम्हाला त्यावरील पोस्टर पाहूनच समजेल की, यात काही तरी नक्कीच आहे. पण हे झालं आत्ताचं… तुम्हाला जर असं सांगितलं की, बॉलिवूडमधील पहिला किसींग सीन हा १९३३ साली चित्रीत करण्यात आला होता. तर तुम्हाला खोटं वाटेल, पण हे खरंय… कदाचित ९९ टक्के प्रेक्षकांना हा सीन माहितीही नसेल… पण या बातमीत अशाच काही किसींग सीन्सबद्दल सांगणार आहोत, जे तुम्ही कदाचित पाहिले नसतील, तसेच त्याबद्दल विचारही केला नसेल…

तर मंडळी पहिला किसींग सीन हा १९३३ साली रिलीझ झालेल्या ‘कर्मा’ सिनेमातील होता. यात भारतीय सिनेसृष्टीतील फर्स्ट लेडी म्हणून प्रसिद्ध असलेल्या देविका राणीचा हिमांशू राय यांच्यासोबतचा तब्बल ४ मिनिटांचा लिप-लॉक सीन होता. यातील गंमत म्हणजे, देविका आणि हिमांशू हे खऱ्या आयुष्यातील पती-पत्नी होते. मात्र, हा लव्ह मेकिंग सीन नव्हता, तर चित्रपटातील कलाकार बेशुुद्ध असतात आणि त्यांना शुद्धीवर आणण्यासाठी अभिनेत्री त्यांना किस करते. हा सीन पाहून प्रेक्षकांचे भान उडाले होते. पुढे हा सीन बॉलिवूडच्या इतिहासातील पहिला किसींग सीन म्हणून नोंदवला गेला.

‘बॉबी’ हा ऋषी कपूर आणि डिंपल कपाडिया या दोघांचा डेब्यू सिनेमा. या सिनेमची गणना होते ती, इंडस्ट्रीतील सर्वोत्कृष्ट सिनेमांमध्ये… खरं तर मंडळी सिनेमात ऋषी आणि डिंपल यांचा एक लिप-लॉक सीन होता, ज्यामुळे सिनेमा चांगलाच गाजला. त्यानंतर १९८५ मध्ये त्यांच्या ‘सागर’ या सिनेमातही ही जोडी पुन्हा झळकली. त्यावेळी त्यांच्या केमिस्ट्रीने पडद्यावर पुन्हा धुमाकूळ घातला. इतकंच नाही, तर त्यांनी एक बेधुंद करणारा किसिंग सीनही दिला होता. या सीननंतर त्यांच्या कथित अफेअर्सच्या अफवाही पसरू लागल्या.

प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री झीनत अमान यांनी सत्तरचं दशक गाजवलं होतं. त्या लोकप्रिय आयकॉन होत्या. त्या आपल्या सौंदर्याने चाहत्यांना वेड लावत होत्या. ‘सत्यम शिवम सुंदरम’ चित्रपटातील शशी कपूर आणि झीनत यांचा किसींग सीन चांगलाच गाजला होता. ते वर्ष होतं १९७८. अजूनपर्यंत भारतीय प्रेक्षक किसींग सीनसारख्या बोल्ड गोष्टींसाठी तयार नव्हते. पण आजही हा सिनेमा इंडस्ट्रीतील सर्वोत्तम चित्रपटांपैकी एक म्हणून ओळखला जातो.

माधुरी दीक्षित म्हणजे बॉलिवूडची ‘धकधक गर्ल’. तिच्या अभिनयाने तसेच नृत्याने तिने बॉलिवूड गाजवलंच. पण तुम्हाला माहितीये का? माधुरी बॉलिवूडमध्ये नवीन होती आणि विनोद खन्ना हे खूप मोठे स्टार होते, तेव्हा या दोघांवर एक किसींग सीन शूट केला गेला होता. तो सिनेमा होता… ‘दयावान.’ त्यांच्या या सीनने सर्वांचच लक्ष वेधून घेतलं होतं. स्क्रिप्टमध्ये किसींग सीनची मागणी असल्यास ते करण्यास मी नेहमीच तयार असल्याचे माधुरीनं अनेकदा सांगितलंय.

२००० साली रिलीझ झालेल्या ‘हे राम’ सिनेमात कमल हासन आणि राणी मुखर्जीचा किसींग सीन होता. या सिनेमातील राणीच्या बोल्ड अवताराने सर्वांनाच हैराण केलं होतं. पण राणीनं एका मुलाखतीत सांगितलं होतं की, ‘हा खरा किसींग सीन नसून कॅमेऱ्याचा अँगल अशाप्रकारे घेतला गेला होता की, तो आमचा किसींग सीन असल्याचं भासत होतं.’

( kissing seen in old bollywood movies )

अधिक वाचा

काही अपघात चांगले असतात, ‘त्या’ एका अपघाताने आख्खं आयुष्य बदललं, आज कोटीत कमावतोय पैसा

HBD I ‘क्या खूब लगती हो!’ सिंपल आणि स्वीट लूकमधील तेजस्विनी पंडितचे आकर्षक फोटो

‘रामायण’मधील ‘सीता’ दीपिका चिखलियाला मॉर्डन अवतारात पाहून भडकले नेटकरी म्हणाले, ‘हातात काय आहे’

हे देखील वाचा