माधुरी दीक्षित अन् रवीना टंडनने एकत्र लावले ‘डान्स दीवाने ३’च्या मंचावर ठुमके; तुम्हालाही आवडेल जुगलबंदी


आपल्या हिंदी चित्रपटसृष्टीबद्दल नेहमीच असे म्हटले जाते की, दोन मोठ्या अभिनेत्री कधीच सोबत येऊ शकत नाही. चित्रपटात आपण अनेक अभिनेत्रींना सोबत काम करताना पाहिले. मात्र, नेहमी कानावर बातम्या येतात की, त्यांच्यात कोल्डवॉर सुरू आहे. सीन पुरते सोबत काम करणाऱ्या या अभिनेत्री ऑफ कॅमेराबोलत सुद्धा नाही, अशा अनेक अफवा किंवा बातम्या आपण ऐकतो आणि वाचतो. याला काही अपवाद देखील आहे. मात्र, काही अभिनेत्री या सोबत काम न करता देखील एकमेकांच्या खूप चांगल्या मैत्रिणी असतात. वेगवेगळ्या कार्यक्रमांदरम्यान या अभिनेत्रींची मैत्री लोकांसमोर येत असते.

सिनेसृष्टीची दिवा म्हणून ओळखली जाणारी माधुरी दीक्षित आणि सौंदर्यवती रवीना टंडन यादेखील एकमेकींच्या चांगल्या मैत्रिणी आहेत. टेलिव्हिजनवरील ‘डान्स दीवाने’ या शोमध्ये नुकतीच रवीनाने हजेरी लावली होती. या शो च्या निमित्ताने या दोघींमधील मैत्री संपूर्ण जगाला पाहायला मिळाली. या आठवड्याच्या भागात या शोमध्ये रवीना टंडनने विशेष उपस्थिती लावली होती. रवीनाच्या येण्याने या शोला चार चाँद लागले. रवीनाने या शो मध्ये ‘टीप टीप बरसा पानी’ गाण्यावर डान्स तर केलाच, सोबतच सर्व स्पर्धकांसाठी सेटवर भजी देखील तळले.

यावेळी प्रेक्षकांना या दोघीच्या डान्सची जुगलबंदी देखील अनुभवायला मिळाली. या दोघीनी जेव्हा स्टेजवर डान्स केला, तेव्हा त्यांनी त्यांच्या डान्सने आणि शानदार एक्सप्रेशन्सने सर्वांची मने जिंकली. या डान्सचा एक व्हिडिओ माधुरी दीक्षितने तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर देखील शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये रवीना पिवळ्या रंगाच्या ड्रेसमध्ये कमाल दिसत असून माधुरी देखील गजबची सुंदर दिसत आहे. या व्हिडिओला आतापर्यंत लाखो व्ह्यूज मिळाले आहेत. फॅन्ससोबतच कलाकार देखील या व्हिडिओवर कमेंट्स करताना दिसत आहेत.

सध्या माधुरी ‘डान्स दीवाने ३’ शोमध्ये परीक्षक म्हणून काम करत असून रवीना लवकरच ‘केजीएफ चॅप्टर २’ मध्ये दिसणार आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-‘प्यार का पंचनामा’ फेम अभिनेत्रीने घातला विचित्र ड्रेस; नेटकरी म्हणाले, ‘आज समजले आपल्या देशात…’

-‘देसी गर्ल’ प्रियांका चोप्राने केला लॉस एंजेलिसमधील आलिशान घरासोबतचा झक्कास फोटो शेअर; किंमत वाचून येईल चक्कर

-अदा शर्माचे विचित्र अंदाजातील फोटो व्हायरल; विचारला असा प्रश्न की, नेटकरीही झाले हैराण


Leave A Reply

Your email address will not be published.