×

मराठीसोबतच हिंदी कलाकारांच्या मनाचा ठाव घेणाऱ्या चंद्रमुखीची धक धक गर्ल माधुरी दीक्षितला देखील पडली भुरळ

सध्या हिंदी, मराठी सगळीकडे फक्त एक आणि एकच सिनेमा गाजत आहे आणि तो म्हणजे चंद्रमुखी. अमृता खानविलकर आणि आदिनाथ कोठारे यांची मुख्य भूमिका असलेला हा सिनेमा लवकरच प्रदर्शित होणार आहे. या सिनेमाने मागील बऱ्याच काळापासून मोठ्या प्रमाणावर बज निर्माण केला आहे. सोशल मीडिया, टीव्ही आदी सर्वच ठिकाणी फक्त आणि फक्त याच सिनेमाच्या चर्चा होताना दिसत आहे. प्रसिद्ध कादंबरीकार विश्वास पाटील यांच्या लेखणीतून तयार झालेल्या ‘चंद्रमुखी’ एक कादंबरीवर हा सिनेमा आधारित आहे.

चंद्रमुखी सिनेमातील गाणी, संगीत, ट्रेलर, संवाद, कलाकारांचा लूक आदी अनेक गोष्टींमुळे हा सिनेमा सतत प्रकाशझोतात येत आहे. याशिवाय हा सिनेमा चर्चेत असण्याचे दुसरे मुख्य कारण म्हणजे, या सिनेमाचे होणारे ताबडतोड प्रमोशन. चित्रपटाचे इतके जोरदार प्रमोशन करण्यात येत आहे, त्यामुळे हा सिनेमा देखील लोकांच्या तोंडावर सतत येत आहे. चंद्रमुखी या सिनेमाने केवळ मराठी मनोरंजनविश्वासोबतच हिंदी सिनेसृष्टीला देखील भुरळ घातली आहे. हिंदीमधील अनेक मोठमोठे कलाकार सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत या सिनेमाचे आणि त्याच्या ट्रेलरचे कौतुक करताना दिसत आहे.

काही दिवसांपूर्वीच अभिनेत्री प्रियांका चोप्राने या सिनेमाचे तोंडभरून कौतुक केले होते. त्यानंतर रितेश देशमुख आणि कॉमेडी क्वीन असलेल्या भारती सिंगने देखील सिनेमाबद्दल पोस्ट शेअर करत त्याचे आणि कलाकारांचे खूप कौतुक केले आहे. आता या दोघानंतर बॉलिवूडची धक धक गर्ल असलेल्या माधुरी दीक्षितने देखील चित्रपटाचे कौतुक केले आहे. माधुरीने तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून या चित्रपटाबद्दल पोस्ट शेअर केली असून, यात तिने लिहिले, “काय सुंदर ट्रेलर आहे…मी नक्कीच हा चित्रपट बघणार आहे.” सोशल मीडियावर सक्रिय असणाऱ्या माधुरीने चंदाचे आणि चंद्रमुखी सिनेमाचे केलेले हे कौतुक म्हणजे चित्रपटाच्या टीमसाठी मोठी शाबासकीच ठरत आहे.

तत्पूर्वी प्रसाद ओक दिग्दर्शित या सिनेमात मृण्मयी देशपांडे, मोहन आगाशे, प्राजक्ता माळी, स्मिता गोंदकर, अशोक शिंदे आदी कलाकारांच्या मुख्य भूमिका असणार आहेत.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा-

Latest Post