Wednesday, June 26, 2024

भोजपुरी अभिनेत्री असलेल्या माही श्रीवास्तवच्या ‘ननद अब हद कइली’ गाण्याने घातला धुमाकूळ

भोजपुरी अभिनेत्री माही श्रीवास्तव आणि शिवानी सिंग यांचे नवीन गाणे वर्ल्ड वाइड रिकॉर्ड्स भोजपुरीवर प्रदर्शित झाले आहे. काही तासातच हे गाणे तुफान गाजायला सुरुवात झाली आहे. गाण्यात माही श्रीवास्तव काहीशी टेन्शनमध्ये दिसत आहे आणि तिचे टेन्शनचे कारण आहे, तीच अविवाहित नणंद. या गाण्यातून माही श्रीवास्तवने आपल्या नणंदेच्या विचित्र वागण्याची पोलखोल केली आहे. काही तासांपूर्वीच प्रदर्शित झालेल्या या गाण्याला आतापर्यंत २५००० पेक्षा अधिक व्ह्यूज आले आहेत. माही श्रीवास्तवच्या या गाण्याला शिवानी सिंगने गायले असून, माही श्रीवास्तव आणि शिवानी यांच्यावर गाण्याचे चित्रीकरण झाले आहे. युद्ध डॆहील अनेक म्युझिक अल्बममध्ये या दोघी एकत्र दिसल्या होत्या. या गाण्याचे नाव आहे ‘ननद अब हद कइली’.

जेव्हा जेव्हा शिवानी सिंगने तिच्या म्युझिक अल्बममध्ये माही श्रीवास्तवला घेतले तेव्हा तेव्हा तिचा अल्बम सुपरडुपर हिट झाला. हे गाणे यूट्यूब चॅनेल वर्ल्डवाइड रिकॉर्ड्स भोजपुरीवर पाहू शकता. या चॅनेलवर मोठ्या प्रमाणात भोजपुरी कलाकारांची गाणी प्रदर्शित केली जातात. या व्हिडिओमध्ये माही श्रीवास्तवच्या लुकबद्दल सांगायचे झाले तर तिने आकाशी रंगाचा लेहेंगा घातला असून, त्यावर छोटे झुमके आणि गळ्यात हेव्ही नेकलेस घातला आहे.

व्हिडिओमध्ये माहीच्या डान्स स्टेप्सने लोकांना वेड लावले असून, तिचा डान्स सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. या गाण्याचे प्रमोशन करण्यासाठी अनेक भोजपुरी स्टार्स यावर रिल्स बनवून सोशल मीडियावर पोस्ट करताना दिसत आहे. हे गाणे तुफान गाजणार हे तर आता स्पष्ट दिसत आहे.

दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सऍप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
अय्याे! अर्जुन कपूरने चक्क व्हिडिओ शेअर करून अभिनेत्रीला म्हटलं, ‘झुटी और मक्कार’
रितेश-जिनेलियाच्या लग्नाला 11 वर्ष पूर्ण, आठवणींना उजाळा देत शेअर केला लग्नाचा व्हिडिओ

हे देखील वाचा