Sunday, September 8, 2024
Home बॉलीवूड मलाईकाने शेयर केले तिचे महिन्याचे वेळापत्रक; ब्रेकअप नंतर अशी सावरतेय स्वतःला…

मलाईकाने शेयर केले तिचे महिन्याचे वेळापत्रक; ब्रेकअप नंतर अशी सावरतेय स्वतःला…

एकेकाळी मलायका अरोरा आणि अर्जुन कपूर यांच्या प्रेमाची सर्वत्र चर्चा होती. दोघेही खुलेपणाने एकमेकांसोबत वेळ घालवताना दिसायचे. कधी डिनर डेटवर, कधी लंच डेट आणि सुट्टीच्या दिवशी. दोघेही अनेकदा मुंबईत एकत्र दिसले. पण, बरेच दिवस झाले ते दोघे एकत्र दिसले नाहीयेत. दोघांचेही ब्रेकअप झाल्याचा दावा केला जात आहे. मात्र, या दोन्ही स्टार्सनी याबाबत कोणतेही अधिकृत वक्तव्य दिलेले नाही. सध्या मलायकाने एक पोस्ट शेअर केली आहे. यामध्ये तिने महिन्याच्या त्यांच्या ‘टू डू लिस्ट’मध्ये समाविष्ट असलेल्या गोष्टींचा उल्लेख केला आहे आणि असाच सल्ला तिने इतरांनाही दिला आहे

मलायकाने तिच्या इन्स्टा स्टोरीवर एक पोस्ट शेअर केली आहे. त्यावर ‘आतापासून तुमचे मासिक वेळापत्रक असे बनवण्याचा प्रयत्न करा’ असे लिहिले आहे. त्यावर लिहिले आहे, ‘मित्रासह लंच डेट. सोशल मीडियापासून २४ तासांचे अंतर. एक दिवस कुठेतरी बाहेर जा. मित्रांसोबत नाईटआउट. डेट नाईट ( स्वतः  सोबत), नाश्त्यासाठी मित्रांना भेटणे. मूव्ही नाईट, इतरांच्या सेवेचा दिवस आणि एक स्वतः सोबतचा दिवस.

मलायका नुकतीच पॅरिसच्या सहलीवरून परतली आहे. ऑलिम्पिकमध्ये सहभागी होण्यासाठी ती तिथे गेली होती. पॅरिसमध्ये खेळांचा आनंद घेण्यासोबतच मलायकाने तिथे फिरण्याचा आनंदही लुटला. अलीकडेच तीने तीच्या पॅरिस ट्रिपचा एक व्हिडिओ शेअर केला आहे. यानंतर, अर्जुनसोबत ब्रेकअप झाल्यानंतर तिच्या आयुष्यात एका नवीन व्यक्तीचा प्रवेश झाल्याची अफवाही वेगाने पसरत आहे.

मलायकाने शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये ती पॅरिसच्या रस्त्यांवर फिरताना दिसत आहे. याशिवाय तिच्या फोटोंमध्ये मिस्ट्री मॅनचाही समावेश आहे. यानंतर यूजर्स विचारत आहेत की ही व्यक्ती कोण आहे? फोटोंमध्ये हा माणूस मलायकासोबत मिरर सेल्फी घेताना दिसत आहे.

अरबाज खानपासून घटस्फोट घेतल्यानंतर अर्जुन कपूरने मलायका अरोराच्या आयुष्यात प्रवेश केला होता. वयात मोठा फरक असूनही त्यांचे अफेअर चर्चेत राहिले. पण आता त्यांच्या नात्यात दुरावा निर्माण झाला आहे. अर्जुन कपूरच्या वाढदिवसाच्या पार्टीतही मलायका अरोरा कुठेच दिसली नाही.

दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा 

हेही वाचा –

लग्नानंतर सोनाक्षी सिंहली करायला लागतोय आर्थिक तंगीचा सामना? अभिनेत्री विकणार वांद्रे अपार्टमेंट

author avatar
Tejswini Patil

हे देखील वाचा