Sunday, May 19, 2024

बोल्ड अंदाजातील फोटो शेअर करत मलायकाने दिल्या होळीच्या शुभेच्छा! नेटकऱ्यांनी केले जोरदार ट्रोल

बॉलिवूडमधील फिट अभिनेत्रींपैकी एक असलेली अभिनेत्री मलायका अरोरा सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. यामुळेच तिचा चाहतावर्गही जबरदस्त आहे. दररोज नवीन फोटो शेअर करून ती चाहत्यांची मने जिंकत असते आणि चाहतेही तिच्या फोटोंवर जोरदार प्रतिक्रिया देताना दिसतात. तिचे फोटो पाहिल्यानंतर, तिच्या वयाचा अंदाज लावणे कठीणच होते. दरम्यान मलायकाने पुन्हा एकदा सोशल मीडिया अकाउंटवर एक अतिशय हॉट फोटो शेअर केला आहे. फोटो शेअर करत तिने चाहत्यांना ऍडव्हान्समध्ये होळीच्या शुभेच्छा दिल्या आहेत. परंतु यामुळे ती ट्रोल झाली आहे.

वास्तविक मलायका अरोराने तिच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवरून एक मोनोक्रोम फोटो शेअर केला असून, तिने तिच्या चाहत्यांना होळीच्या शुभेच्छा देखील दिल्या आहेत. फोटोमध्ये अभिनेत्री तिच्या गच्चीवर ट्रेंडी पांढऱ्या आणि काळा कपड्यात, कोणाचा तरी फोटो क्लिक करताना दिसत आहे. हा फोटो पाहून काही युजर्स मलायकाचे कौतुक करत आहेत, तर काहीजण तिची खिल्लीही उडवत आहेत.

मलायकाने या ब्लॅक अँड व्हाईट फोटोसह एक कॅप्शनही लिहिले आहे. तिने लिहिले, “तुम्हा सर्वांना अगोदरच होळीच्या शुभेच्छा. तुम्ही सर्वजण सुरक्षित राहा आणि घरीच रहा.” फोटोसोबतच चाहत्यांना कॅप्शनही आवडले असून चाहते कमेंट बॉक्समध्ये आपले प्रेम व्यक्त करत आहेत.

त्याचवेळी काही युजर्स ट्रोल करून तिच्या फोटोची खिल्लीही उडवत आहेत. एका युजरने ट्रोल करत लिहिले, “ही खरोखरच बदनाम झाली आहे.” दुसर्‍या युजरने लिहिले की, “या लोकांना तर फक्त मूर्ख बनवण्याची संधी पाहिजे.” आणखी एका युजरने लिहिले की, “तू हे सगळं बंद कर, नाहीतर मी तुला ब्लॉक करेल.”

हे लक्षात घेण्यासारखे आहे की, मलायका तिच्या ग्लॅमरस स्टाईल आणि बोल्ड लूकसोबतच, बर्‍याचदा तिचा बॉयफ्रेंड अर्जुन कपूरबद्दलही चर्चेचा विषय बनत असते. अर्जुन आणि मलायका बर्‍याच दिवसांपासून एकमेकांना डेट करत आहेत. तरी अद्याप या दोघांनी आपल्या नात्याची पुष्टी केली नाही, परंतु त्यांचे प्रेम कोणापासून लपलेलेही नाही. दोघांना अनेकदा एकत्र स्पॉट केले जाते.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-हॉलिवूडमधील ‘द सुसाईड स्क्वॉड’ चित्रपटाचा ट्रेलर झाला रिलीझ, जॉन सीनाचा जबरदस्त अंदाज

-‘खूप भारी दिसतेय’, हिना खानच्या समुद्रावरील ग्लॅमरस फोटोंवर चाहत्याची कमेंट

-हिना खानच्या हॉट अंदाजावर चाहत्यांसह सेलिब्रिटीही फिदा! कमेंट्स करत केले अभिनेत्रीचे कौतुक

हे देखील वाचा