Sunday, December 3, 2023

ब्रेकिंग! मराठमोळ्या अभिनेत्याचा भाजपमध्ये जाहीर प्रवेश; चाहता म्हणाला, ‘तुझ्यासारखा संवेदनशील व्यक्ती…’

मराठी कलाक्षेत्रातून बातमी समोर येत आहे. मराठमोळा अभिनेता अभिजीत केळकर याने भारतीय जनता पक्षात जाहीर प्रवेश केला आहे. अभिजीतने भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत बुधवारी (दि. 30 ऑगस्ट) भाजपमध्ये प्रवेश केला. यावेळी अभिनेत्री प्रिया बेर्डे यादेखील उपस्थित होत्या. अभिजीतने भाजप पक्षात प्रवेश केल्याची माहिती त्याच्या अधिकृत सोशल मीडिया अकाऊंटवरून दिली आहे.

अभिनेता अभिजीत केळकरची इंस्टा पोस्ट
मराठी अभिनेता अभिजीत केळकर (Abhijeet Kelkar) याने त्याच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवरून ही माहिती दिली आहे. त्याने चंद्रशेखर बावनकुळे आणि प्रिया बेर्डे (Priya Berde) यांच्यासोबतचा फोटो शेअर केला आहे. यासोबतच त्याने कॅप्शनमध्ये लिहिले, “भारतीय जनता पक्षात जाहीर प्रवेश… जसं ते म्हणतात, व्यवस्था बदलण्यासाठी तुमचं व्यवस्थेत असणं गरजेचं आहे. किती काळ काठावर उभं राहून नावं ठेवायची? त्या प्रवाहात सामिल होऊन, समजून घेऊन, काम करण्याचा प्रामाणिक प्रयत्न करूया.”

 

View this post on Instagram

 

A post shared by Abhi Kelkar (@abhijeetkelkar21)

अभिजीतच्या या पोस्टवर चाहत्यांनी त्याच्यावर अभिनंदनाचा वर्षाव केला आहे. एका चाहत्याने लिहिले की, “काय सरप्राईज दिलंय. अगदी अनपेक्षित. तुझ्या नव्या प्रवासासाठी खूप शुभेच्छा.” दुसऱ्या एकाने लिहिले की, “तुझ्यासारखा संवेदनशील व्यक्ती संवेदनशील पक्षात सहभागी होण्याचा खूप आनंद झालाय.” आणखी एकाने लिहिले की, “मनापासून अभिनंदन सर.” एका युजरने असेही लिहिले की, “योग्य निर्णय, खूप शुभेच्छा.”

अभिजीतच्या कामाविषयी
अभिनेता अभिजीत याने आतापर्यंत अनेक सिनेमात आणि मालिकात काम केले आहे. त्यामध्ये ‘काकस्पर्श’, ‘मी शिवाजीराजे भोसले बोलतोय’, ‘बालगंधर्व’, ‘तुझं माझं जमेना’, ‘असंभव’ यांचा समावेश आहे.

प्रिया बेर्डेंनी फेब्रुवारीत केला होता भाजप प्रवेश
सुप्रसिद्ध अभिनेता लक्ष्मीकांत बेर्डे यांची पत्नी आणि अभिनेत्री प्रिया बेर्डे यांनीही भाजप पक्षाच्या नेत्या आहेत. प्रिया यांनी यावर्षीच्या सुरुवातीला फेब्रुवारी महिन्यात भारतीय जनता पक्षात प्रवेश केला होता. त्याआधी त्यांनी 2020मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला होता. (marathi actor Abhijeet Kelkar join bharatiya janata party shared post on instagram)

हेही वाचा-
शाहरुखने ‘Jawan’च्या रिलीजपूर्वी घेतले वैष्णो देवीचे दर्शन, कडक सुरक्षा घेऱ्यात दिसला ‘किंग’ खान
गंभीर आजाराचा सामना करतेय ‘ही’ पाकिस्तानी अभिनेत्री; शाहरुखच्या ‘रईस’ अन् रणबीरमुळे आलीय वेळ

हे देखील वाचा