साडीमध्ये अभिनेत्रीच्या मनमोहक अदांनी लावले सर्वांनाच वेड! चाहत्यांसह कलाकारही झाले अमृता खानविलकर फिदा

Marathi actress amruta khanvilkar shared latest video in saree showing her toned figure


‘नटरंग’ चित्रपटातील ‘वाजले की बारा’वर थिरकत अभिनेत्री अमृता खानविलकरने प्रेक्षकांची मने चोरली. आपल्या अप्रतिम नृत्य कौशल्याचा वापर करून तिने इंडस्ट्रीमध्ये आपली जबरदस्त ओळख निर्माण केली आहे. याशिवाय अमृता आपल्या सौंदर्यानेही बऱ्याच चर्चा रंगवत असते. दरदिवशी वेगवेगळ्या पोस्ट्स शेअर करत, अभिनेत्री अवघ्या सोशल मीडियाचे लक्ष वेधते. नुकताच तिने एक व्हिडिओ शेअर केला आहे, जो सध्या इंटरनेटवर व्हायरल होत आहे.

हा व्हिडिओ अमृताने तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर शेअर केला आहे. ज्यात तिने साडी परिधान केलेली दिसत आहे. एका इंग्रजी गाण्यावर अभिनेत्री अतिशय मनमोहक स्टाईलमध्ये थिरकत आहे. साडीसोबत खेळण्याची तिची अदा पाहून, नेटकरी तिच्यासाठी पुरते वेडे झाले आहेत, असे म्हणणे वावगे ठरणार नाही.

अमृताचा हा भुरळ पाडणारा व्हिडिओ इंस्टाग्रामवर जोरदार व्हायरल होत आहे. चाहते यावर लाईक्स आणि कमेंट्सच्या माध्यमातून आपल्या प्रतिक्रिया व्यक्त करत आहेत. चाहत्यांसह सेलिब्रिटीही व्हिडिओवर कमेंट करताना दिसले आहेत. अभिनेत्री क्रांती रेडकर आणि अभिनेता आदिनाथ कोठारेने अमृताचे कौतुक केले आहे.

अमृता खानविलकरने ‘गोलमाल’ या मराठी चित्रपटात अभिनय करून चित्रपटसृष्टीत पदार्पण केले होते. यानंतर तिने बऱ्याच चित्रपटात काम केले. इतकेच नव्हे, तर तिने हिंदी चित्रपटातही बऱ्याच महत्वपूर्ण भूमिका साकारल्या आहेत.

वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले, तर नुकताच अभिनेत्रीचा ‘वेल डन बेबी’ हा चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीझ झाला आहे. यात तिच्यासोबत पुष्कर जोग आणि वंदना गुप्ते हे कलाकार मुख्य भूमिकेत पाहायला मिळाले आहेत. याशिवाय लवकरच ती ‘पॉंडीचेरी’ या मराठी चित्रपटातही दिसणार आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-प्रेक्षकांच्या भेटीला आलाय ‘घाघरा’! ‘देसी क्वीन’ सपना चौधरीच्या नव्या गाण्याचा पुन्हा एकदा देशभरात जलवा

-लाल साडीत पत्नी निघाली माहेरी! अंकुश राजाच्या ‘नारियलवा जोड़े जोड़े’ने तोडले सर्व रेकॉर्ड!

-तब्बल दहा किलो वजन कमी केलेल्या श्वेता तिवारीच्या स्टनिंग लुकची सगळीकडेच चर्चा! पाहा ‘हे’ खास फोटोज


Leave A Reply

Your email address will not be published.