Thursday, April 25, 2024

‘सुख म्हणजे काय ते हेच असतं!’ मराठमोळ्या श्रेया बुगडेला ‘आचार्य अत्रे कलाकार पुरस्कार’ प्रदान

प्रल्हाद केशव अत्रे ऊर्फ आचार्य अत्रे मराठीतील नावाजलेले लेखक, कवी, नाटककार, संपादक, पत्रकार, राजकारणी व वक्ते होते. ते महाराष्ट्राच्या निर्मितीसाठी उभ्या राहिलेल्या संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीतील प्रमुख नेते होते. विशेष म्हणजे, आचार्य अत्र्यांच्या घणाघाती भाषणांमुळेच संयुक्त महाराष्ट्र मिळाला असे देखील मानले जाते. त्यांचा १३ जून रोजी वाढदिवस असतो. या निमित्ताने आचार्य अत्रे प्रतिष्ठान यासारख्या अनेक संस्था आचार्य अत्रे पुरस्कार देतात.

नुकताच हा पुरस्कार अभिनेत्री श्रेया बुगडेला मिळाला आहे. श्रेया बुगडेने तिच्या इंस्टाग्रामवर एक पोस्ट शेअर करून, चाहत्यांना ही आनंदाची बातमी दिली आहे. पुरस्कार घेतानाचे काही फोटो शेअर करत, तिने कॅप्शनमध्ये तिचा आनंद व्यक्त केला आहे. कॅप्शनमध्ये श्रेया म्हणतेय की, “ते पाडगावकरांनी म्हटलंय ना… ‘सुख सुख म्हणजे  नेमकं काय असतं ? ज्याच्यात मानावं त्याच्यात ते असतं.. भर पहाटे धुक्याची रेषा डोळ्याला दिसणं, सोनचाफ्याची फुले वेचताना हातांचं सुगंधी होणं, नंदादिपातल्या ज्योतीकडे एक क्षण बघणं, सुख सुख म्हणजे नेमकं काय असतं ? ज्याच्यात मानावं त्याच्यात ते असतं..’ माझ्या छोट्याश्या वाटेला आलेलं खूप मोठ्ठ सुख !!!! आचार्य अत्रे कलाकार पुरस्कार २०२१”

ही पोस्ट व्हायरल झाल्यानंतर लगेचच श्रेयावर शुभेच्छांचा पाऊस पडायला सुरुवात झाली. या फोटोवर कमेंट करून चाहते श्रेयाचे भरभरून अभिनंदन करत आहेत.

‘वाटेवरती काचा गं’ या नाटकाद्वारे अभिनय क्षेत्रात पाऊल ठेवल्यानंतर श्रेया बऱ्याच कॉमेडी शोमध्ये दिसली. मात्र, तिला खरी ओळख ‘चला हवा येऊ द्या’ या शोने मिळवून दिली. या शोमध्ये काम करून श्रेयाने प्रेक्षकांचे खूप मनोरंजन केले. तसेच, शोच्या कामगिरीमध्ये श्रेयाचा देखील मोलाचा वाटा आहे, असे म्हणणे चुकीचे ठरणार नाही.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-‘तुला प्रेग्नेंट राहायला आवडते का?’, म्हणणाऱ्या युजरची अभिनेत्रीने केली बोलती बंद; म्हणाली, ‘आता बास…’

-‘तुम्ही त्याचा टीआरपीसाठी वापर केला आणि…’, पवनदीपच्या परफॉर्मन्सवर कात्री चालवणाऱ्या निर्मात्यांवर भडकले चाहते

-‘…सर्वकाही डोळ्यात असतं!’, म्हणत मराठमोळ्या अमृता खानविलकरचं ब्लॅक ऍंड व्हाईट फोटोशूट आलं चर्चेत

हे देखील वाचा