Saturday, April 20, 2024

‘इतकं सुंदर कसं असू शकतं कोणी?’, चाहत्यांसोबत अनुजा साठेच्या फोटोवर उमतातयेत कलाकारांच्याही प्रतिक्रिया

अनेक मराठी मालिका आणि चित्रपटात काम करून नावारूपाला आलेली अभिनेत्री म्हणजे अनुजा साठे होय. तिने पुढे तिच्या अभिनयाचा प्रवास हिंदी टेलिव्हिजन आणि चित्रपटाकडे देखील वळवला. तिथे देखील तिच्या अभिनयाला प्रेक्षकांनी चांगलेच नावाजले. अनुजा एक विविध गुणसंपन्न असणारी अभिनेत्री आहे. तिने अगदी साध्या भूमिकांपासून ते अत्यंत बोल्ड भूमिका साकारल्या आहेत. अनुजा तिच्या आयुष्यात फिटनेसला‌ खूप महत्व देते. अनेकवेळा तिचे जिममधील फोटो आणि व्हिडिओ ती शेअर करत असते. अशातच तिचे काही ग्लॅमरस फोटो समोर आले आहेत.

अनुजाने अलीकडेच इंस्टाग्रामवर तिचे काही फोटो शेअर केले आहेत. या फोटोमध्ये आपण पाहू शकतो की, तिने काळ्या रंगाचा क्रॉप टॉप, पँट परिधान केली आहे. यावर तिने गुलाबी रंगाचे जॅकेट घातआले हे. गळ्यात काही सोनेरी रंगाची फॅशनेबल ज्वेलरी घातली आहे. तसेच हातात केवळ एक घड्याळ घातले आहेत. केस कर्ली करून त्यांना एक वेगळा लूक देण्याचा प्रयत्न केला आहे. या लूकमध्ये ती खूप सुंदर दिसत आहे. (Marathi actress Anuja sathe share her glamorous photos on social media)

तिच्या या फोटोवर अनेक कलाकार तसेच तिचे चाहते त्यांच्या प्रतिक्रिया व्यक्त करत आहेत. या फोटोवर रेशमा शिंदे हिने फायर ईमोजी पोस्ट केली आहे. तसेच अभिज्ञा भावे हिने “हॉटेस्ट बेगम,” अशी कमेंट केली आहे. एका चाहत्याने कमेंट केली आहे की, “ओह माय गॉड, इतकं सुंदर कसं असू शकतं कोणी?” तसेच इतर अनेक चाहते देखील या फोटोवर कमेंट करत आहेत.

अनुजाच्या कामाबद्दल बोलायचे झाल्यास, तिने अनेक हिंदी आणि मराठी मालिकांमध्ये काम केले आहे. तिने ‘पेशवा बाजीराव’, ‘तमन्ना’, परमाणू’, ‘झाँसी की राणी’, ‘बाजीराव मस्तानी’ या हिंदी चित्रपटात आणि मालिकांमध्ये काम केले आहे. तसेच तिने मराठीमध्ये ‘व्हाट्सऍप लग्न’, ‘राखणदार’, ‘मी पण सचिन’, ‘भो भो’, ‘घंटा’, ‘मांडला दोन घडीचा डाव’, ‘लगोरी’ या मराठी मालिका आणि चित्रपटात काम केले आहे.

दैनिक बोंबाबोंचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-‘रंग माझा वेगळा’ मालिकेने गाठला ५०० एपिसोड्सचा टप्पा, कलाकारांनी ‘अशा’प्रकारे साजरा केला खास क्षण

-ड्रग्ज प्रकरणी अभिनेता गौरव दीक्षितला मिळाला जामीन, पण कोर्टाने दिल्या ‘कडक’ सूचना

-कृष्णा अभिषेकने असे काय केले की, नेहा कक्करला कोसळले रडू? पाहा ‘हा’ व्हिडिओ

हे देखील वाचा