‘माझा होशील ना’ फेम ‘सई’च्या ग्लॅमरस फोटोंचा सोशल मीडियावर धुमाकूळ, पाहून तुम्हीही कराल कौतुक

टेलिव्हिजनवरील अनेक मालिकांनी नुकतेच काही दिवसांपूर्वी प्रेक्षकांचा निरोप घेतला आहे. त्यातील सगळ्यांची आवडती मालिका ‘माझा होशील ना’ या मालिकेने एका वर्षातच हाहा म्हणता यशाचे शिखर गाठले. मालिकेचे कहाणी काहीशा वेगळ्या आशयावर आधारित असल्याने प्रेक्षकांनी देखील मालिकेला जबरदस्त प्रतिसाद दिला. झी मराठी पुरस्कार सोहळ्यात देखील या मालिकेला अनेक पुरस्कारांनी गौरवण्यात आले आहे. यावरूनच या मालिकेची लोकप्रियता लक्षात येते.

मालिकेत मुख्य भूमिकेत असणारी सई आणि आदित्य ही पात्र देखील प्रेक्षकांना खूप आवडली होती. ही पात्र गौतमी देशपांडे आणि विराजस कुलकर्णी यांनी निभावली होती. मालिकेत सई या पात्राने लोकप्रिय झालेली गौतमी सोशल मीडियावर बऱ्यापैकी सक्रिय असते. तिचे वेगवेगळे फोटो आणि व्हिडिओ ती सोशल मीडियावर शेअर करून तिच्या चाहत्यांना दाखवत असते. अशातच तिचे काही फोटो समोर आले आहेत. (Marathi actress gautami deshpande share her photo on social media)

View this post on Instagram

A post shared by Gautami Deshpande (@gautamideshpandeofficial)

गौतमीने सोशल मीडियावर तिचे काही फोटो शेअर केले आहेत. या फोटोमध्ये तिने निळ्या रंगाचा टॉप आणि पांढऱ्या रंगाची जिन्स घातली आहे. तिने केसांचा हाफ बन घालून स्मोकी आय मेकअप केला आहे. फोटोमध्ये ती नेहमीपेक्षा काहीतरी वेगळी आणि ग्लॅमरस दिसत आहे. तिने या ड्रेसमध्ये वेगवेगळ्या पोझ देत फोटोशूट केले आहे.

View this post on Instagram

A post shared by Gautami Deshpande (@gautamideshpandeofficial)

तिचा हा फोटो सोशल मीडिया युजर्सला खूप आवडला आहे. अनेकजण या फोटोवर कमेंट करून तिच्या या लूकचे कौतुक करत आहेत. अनेकांना तिच्या या फोटोमधील स्माईल खूप आवडली आहे. त्यामुळे अनेकजण या फोटोवर कमेंट करत आहेत.

View this post on Instagram

A post shared by Gautami Deshpande (@gautamideshpandeofficial)

गौतमी ही टेलिव्हिजनवरील एक लोकप्रिय अभिनेत्री आहे. सोशल मीडियावर देखील तिची तगडी फॅन फॉलोविंग आहे. तिच्या प्रत्येक पोस्टला तिचे चाहते भरभरून प्रतिसाद देत असतात. तिने ‘माझा होशील ना’ या मालिकेच्या आधी ‘सारे तुझ्याचसाठी’ या मालिकेत काम केले आहे. या मालिकेत तिच्यासोबत हर्षद अटकरी मुख्य भूमिकेत होता.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-‘तुरू तुरू चालू नको’, म्हणत शालूने शेअर केला तिचा अफलातून व्हिडिओ, तिच्या लूकने वेधले सर्वांचे लक्ष

-डीप नेक ड्रेसमधील मराठमोळी अभिनेत्री मिथिला पालकरचे फोटो व्हायरल, सर्वत्र रंगलीय तिच्या लूकची चर्चा

-श्रुती मराठेच्या साडीमधील फोटोचे चाहत्याकडून कौतुक, म्हणाला, ‘…तेव्हा आणखीनच भारी दिसते’

Latest Post