Thursday, June 13, 2024

‘ठरलं तर मग’ मालिकेतून ‘या’ अभिनेत्रीने घेतला ब्रेक; केतकी पालव करणार दमदार एन्ट्री

स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘ठरल तर मग‘ या मालिकेनं अल्पावधीतच प्रेक्षकांच्या मनात स्थान निर्माण केलं आहे. ही टीआरपीच्या शर्यतीत अव्वल स्थानावर आहे. या मालिकेतील अर्जुन व सायलीची जोडी प्रेक्षकांना खूप आवडतं आहे. या मालिकेतील खलनायिकाची भूमिका करणारी ‘बिग बॉस मराठी’ फेम अभिनेत्री मीरा जगन्नाथ हिचा अभिनय देखील प्रेक्षकांना आवडला होता ,पण आता मीरा जगन्नाथ हिने मालिका सोडल्याचं समोर आलं आहे.

ठरलं तर मग’ मालिकेतील प्रत्येक पात्र घराघरात पोहोचलं आहे. या मालिकेतील प्रत्येक पात्राने प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. अभिनेत्री मीरा जगन्नाथ हिनं ‘ठरलं तर मग’ या मालिकेत नकारात्मक पात्र साकारलं होतं. ‘साक्षी’ असं या पात्राचं नाव होतं. पण आता मीरानं प्रेक्षकांचा निरोप घेतला आहे. यामागचं नेमकं कारण अद्याप समजू शकलेलं नाही. परंतु, तिने अचानक मालिका सोडली या कारणांमुळे चाहते मात्र नाराज झाले आहेत.

मीरा जगन्नाथच्या जागी आता अभिनेत्री केतकी पालव मालिकेत झळकली आहे. याआधी केतकीनं बऱ्याच मालिकांमध्ये काम केलं आहे. तसेच ती ‘आमने सामने’ या नाटकातही दिसली आहे. मागील आठवड्यात सुद्धा ‘ठरलं तर मग’ मालिका टीआरपीच्या यादीत अव्वल स्थानावर आहे.

गेल्या अनेक दिवसापासून हि मालिका टीआरपीच्या यादीत पहिल्या नंबरवर आहे इतके दिवस “आई कुठे काय करते “हि मालिका टीआरपीच्या यादीत अव्वल स्थानावर होती. पण आता आई कुठे काय करते हि मालिका दुसऱ्या स्थानावर आहे. त्यानंतर ‘सुख म्हणजे नक्की काय असतं’, ‘रंग माझा वेगळा’, ‘तुझेच मी गीत गात आहे’ या मालिका अनुक्रमे टॉप ५ मध्ये होत्या.(marathi actress mira jagannath exit from the tharla tar mag ketki palav played sakshi role)

अधिक वाचा- 
पाहा सुभेदारांचं कुटुंब! ‘या’ चित्रपटात दिसणार मृणाल कुलकर्णी, लेक विराजस आणि सून शिवानी पहिल्यांदाच एकत्र
कामाच्या स्पर्धेपेक्षाही मैत्री महत्वाची! ‘हे’ आहेत मराठीतील घट्ट कलाकार मित्र

हे देखील वाचा