‘या’ अभिनेत्याला करायचंय प्रिया बापटचं तोंडभरून कौतुक; अभिनेत्री म्हणाली, ‘आज कॉल करते’


मराठी चित्रपटसृष्टीतील सध्या टॉपला असणारी अभिनेत्री प्रिया बापट. प्रिया सध्या जोरदार चर्चेत आहे. सोशल मीडियावर तिचा मोठ्या प्रमाणात वावर असतो. दररोज तिच्या चाहत्यांसाठी ती न चुकता फोटो आणि व्हिडिओ शेअर करत असते. तिचे चाहते देखील तिच्या फोटोंना खूप चांगला प्रतिसाद देत असतात. प्रियाने अनेक चित्रपट तसेच नाटकांमध्ये काम करून तिची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. प्रियाने अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवरून तिचा एक गोंडस फोटो शेअर केला आहे.

प्रियाने शेअर केलेल्या या फोटोमध्ये तुम्ही पाहू शकता की, तिने निळ्या रंगाची एक सुंदर साडी नेसलेली आहे. अत्यंत साध्या साडीमध्ये देखील ती फार सुंदर दिसत आहे. तिने गळ्यात मंगळसूत्र घातलेले दिसत आहे. तसेच एक छोटी टिकली लावली आहे. फोटोमध्ये तिची स्माईल‌ खूप सुंदर दिसत आहे. (Marathi actress priya bapat share her sweet photo on social media)

हा फोटो शेअर करून प्रियाने “अगंबाई केवढ्या कॉम्प्लिमेंट” असे कॅप्शन दिले आहे. तिच्या चाहत्यांना तिचा हा फोटो खूप आवडला आहे. तिचे अनेक चाहते तसेच कलाकार देखील या फोटोवर कमेंट करत आहेत. या फोटोवर अभिनेता आशुतोष गोखले याने “मला ही द्यायच्या आहेत, कधी वेळ आहे तुला प्रिया?” अशी कमेंट केली आहे तर. प्रियाने यावर “हाहाहा आज कॉल करते” असा रिप्लाय दिला आहे.” तसेच ऋता दुर्गुळे हिने देखील कमेंट केली आहे. तसेच तिचे अनेक चाहते या फोटोवर प्रतिक्रिया देत आहेत.

नाटक, मालिका आणि त्यानंतर चित्रपट अशा अनेक माध्यमांद्वारे, आपल्या अभिनयाची छाप सोडणारी अभिनेत्री प्रिया बापटने, अगदी कमी कालावधीत आपली खास ओळख निर्माण केली आहे. तिने ‘वजनदार’, ‘टाइमपास २’, ‘लोकमान्य: एक युगपुरूष’, ‘आंधळी कोशिंबीर’, ‘टाइम प्लिज’, ‘काकस्पर्श’, ‘मी शिवाजी राजे भोसले बोलतोय’ यांसारख्या चित्रपटात अभिनय करून, लाखो चाहत्यांच्या मनात घर केले आहे. याशिवाय प्रिया संजय दत्त अभिनित ‘लगे रहो मुन्नाभाई’ आणि ‘मुन्नाभाई एमबीबीएस’ या हिंदी चित्रपटातही दिसली आहे. तसेच उमेशने देखील अनेक चित्रपटात काम केले आहे. तो सध्या ‘अजूनही बरसात आहे’ या मालिकेत मुक्ता बर्वेसोबत काम करत आहे.

दैनिक बोंबाबोंचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-दुःखद! मल्याळम अभिनेता रिजाबावा यांचे दीर्घ आजाराने झाले निधन

-सिद्धार्थच्या निधनानंतर ॲडमिट झाली होती जसलीन, नवीन व्हिडिओमुळे पुन्हा झाली ट्रोल

-Bigg Boss OTT: ‘राकेश तालावर नाचणारा नाहीये’, काम्या पंजाबीने साधला शमिता शेट्टीवर जोरदार निशाणा


Leave A Reply

Your email address will not be published.