Thursday, April 18, 2024

रेशम टिपणीसवर कोसळला दु:खाचा डोंगर, ‘ही’ जवळची व्यक्ती गमवल्याने हळहळली अभिनेत्री

मराठी सिनेसृष्टीमधील प्रसिद्ध अभिनेत्रींपैकी ओळखली जाणारी  रेशम टिपणीस हिला ओखलं जातं. हिने अनेक मराठी आणि हिंदी चित्रपटांमध्ये आपल्या दमदार अभिनयाने प्रेक्षकांच्या मनात वेगळेच स्थान निर्माण केले आहे. त्याशिवया ती मराठी बिग बॉसमध्येही सहभागीझाली होती. रेशम सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. तिच्या नुकत्याच एका पोस्टमुळे समजले आहे की,अभिनेत्रीवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. तिने पोस्ट शेअर करत तिचे दु:ख व्यक्त केले आहे.

मराठी मालिका आणि चित्रपटांमध्ये आपल्या दमदार अभिनयाने प्रेक्षकांवर ठसा उमटवणारी प्रसिद्ध अभिनेत्री रेशम टिपणीस (Resham Tipnis) हिच्यावर मोठा दु:खाचा डोंगर कोसळला आहे. नुकतंच रेशमच्या आईचे निधन झाले आहे त्यामुळे अभिनेत्री खूपच हळहळली आहे. तिने तिच्या आईसोबत काही फोटो शेअर करत दु:ख व्यक्त केले आहे.

प्रत्येक मुलगी आई-बाबांची लाडकी असते, तसंच रेशमही तिच्या आईची खूप लाडकी असून तिच्या आईसोबत अनोखं नातं होतं. आईच्या निधनामुळे रेशमला मोठा धक्का बसला आहे. तिने आईसोबत काही फोटो शेअर करत खंत व्यक्त केली आहे की, ‘आईच्या आणि तिच्या होणाऱ्या गप्पा-गोष्टींची आठवण येत आहे आसंही तिने सांगितलं आहे.’

 

View this post on Instagram

 

रेशमने फोटो शेअर करत कॅप्शनमध्ये लिहिले की, “आई…यापुढे तुझा कधीच मला फोन येणार नाही, या गोष्टीवर अजूनही माझा विश्वास बसत नाही. तु मला खंबीर बनवलं आहेस आणि या पुढेही मी अशीच खंबीर राहील. खुप प्रेम मला तुझी खुप आठवण येत आहे.”

रेशमची ही भावूक करणारी सोशल मीडिया पोस्ट तिच्या चाहत्यांना आणि इतर कलाकारांनाही भावूक करत आहे. तिने शेअर केलेल्या फोटोंवर अनेक चाहत्यांनी आणि कलाकारांनी तिला सांत्वना दिली आहे. त्याशिवाय रेशच्या आईला श्रद्धांजली वाहिली आहे.

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-

कोन होते खऱ्या आयुष्यातील ‘तारक मेहता’? वाचा ‘तो’ रंजक किस्सा
ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चनच्या लग्नावर सलमान खानने दिली होती प्रतिक्रिया; म्हणाला, ‘मी ऐश्वर्याच्या…’

हे देखील वाचा