Friday, March 29, 2024

कोण होते खऱ्या आयुष्यातील ‘तारक मेहता’? वाचा ‘तो’ रंजक किस्सा

टीव्हीवरील लोकप्रिय कार्यक्रम ‘तारक मेहता का उल्टा चश्मा‘ने अनेक वर्षापासून प्रेक्षकांवर राज्य केले आहे. त्याशिवाय हा कार्यक्रम लोकांच्या घरातील एक अविभाज्य भाग बनला आहे. यामधील प्रत्येकच पात्राने चाहत्यांच्या मनात वेगळेच स्थान निर्माण केले आहे. त्याशिवाय आजही लोकं त्यांना त्यांच्या पात्रानेच ओळखतात. मात्र, ही कथा सुरु झाली कशी असा प्रश्न अनेकांना पडला आहे, तर आज आम्ही तुम्हाला खऱ्या आयुष्यामधील तारक मेहत कोण होते. हे त्यांच्या पुण्यतिथीनिमित्त सांगणार आहोत.

लोकप्रिय टीव्ही कार्यक्रम ‘तारक मेहता का उल्टा चश्मा’ (Tarak Mehta Ka Ooltah Chashma) याने देशभरात अनेक प्रेक्षकांना भुरळ घातली आहे. हा कार्यक्रम गुजरातमधील दिग्गज कॉलमनिस्ट तारक मेहता (columnist taarak mehta) यांच्या ‘दुनिया ने उंधा चश्मा’ या कॉलमवर आधारित आहे. त्याशिवाय या नाटकाची सुरुवात खूपच वेगळ्या पद्धतीने केली होती. झाले असे की, या कार्यक्रामाचे दिग्दर्श असित मोदी (Asit Modi) यांचे खास मित्र जतिन कनकिया यांनी या कार्यक्रामाची युक्ती सुचवली होती. त्यांनीच असित मोदी यांना तारक मेहता यांनी हे कॉलम दाखवले. ही गोष्ट स्वत: असित मोदींनी एका मुलाखतीदरम्या सांगितली होती.

ही गोष्ट 1995 ची आहे जेव्हा कॉलमनिस्ट तारक मेहता मुंबईवरुन अहमदाबदला गेले होते. 1997 मध्ये त्यांची ओळख असित मोदी यांच्याशी झाली. दोघांनाही ‘दुनिया ने उंधा चश्मा’ यावर आधारित एक मालिका बनवण्याचा विचार केला होता, दोन वर्ष या गोष्टीवर त्यांची चर्चा चालत होती. मात्र, त्यावेळी तारक मेहता यांच्या मनात वेगळे विचार सुरु होते, कारण सुरुतमध्ये राहाणारा त्यांचा मित्र महेश भाई (Mahse Bhai) हा देखिल या कॉलमवर मालिका बनवण्याची तयारी करत होता. त्यांनी एक-दोन भाग देखिल तयार केले होते. कॉलमनिस्ट तारक मेहता यांनी असित मोदी आणि महेश भाई यांची ओळख करुन दिली आणि कार्यक्रमाचे नाव ‘तारक मेहता का उल्टा चश्मा’ असं ठेवलं कारण तारक मेहता हे समाजतील होणाऱ्या घचनांना वेगळ्याच अंदाजात पाहात असे.

सगळ्या गोष्टी सुरळीत झाल्यानंतरही असित मोदी यांच्या वाटेत खूप अडचनी आल्या होत्या. त्यावेळी सगळ्या चॅनेलने हा कार्यक्रम प्रदर्शित करण्यास नकार दिला होता. शेवटी काही काळानंतर सगळ्या चॅनेलने कार्यक्रमास होकार दिला आणि 2009 साली तारक मेहता का उल्टा चश्मा या कार्यक्रमाला सुरुवात झाली. आतापर्यत या कार्यक्रमाचे 2200 पेक्षाही जास्त भाग प्रदर्शित झाले आहेत. या कार्यक्रमातील जेठालाल, दयाबेन, सोडी, हाथी भाई, भिडे, चाचाजी सारख्या अनेक पात्रांनी प्रेक्षकांच्या मनात मोठे स्थान निर्माण केले आहे.

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा

हेही वाचा-
ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चनच्या लग्नावर सलमान खानने दिली होती प्रतिक्रिया; म्हणाला, ‘मी ऐश्वर्याच्या…’
‘अन्न तू नाही अल्लाह देतो’, जेव्हा सर्वांसमोर सलमान खानवर चिडल्या होत्या कोरिओग्राफर सरोज खान

हे देखील वाचा