‘बाबा ड्युटीवर असताना…’ मराठी अभिनेत्री रेश्मा शिंदेच्या ‘फादर्स डे’ स्पेशल पोस्टची सोशल मीडियावर चर्चा

नुकताच जागतिक पितृदिन सर्वत्र साजरा केला गेला. आपल्या मुलांच्या यशासाठी आयुष्यभर झटणाऱ्या आणि त्यांच्याच यशात आपलं यश मानणाऱ्या वडिलांचा हा दिवस प्रत्येकासाठीच खास असतो. याच निमित्ताने अनेकांनी आपल्या वडिलांसोबतचे खास क्षणांचे फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले होते.तर काहींनी आपल्या वडिलांच्या सुंदर आठवणी सोशल मीडियावरुन व्यक्त केल्या होत्या. यामध्ये मराठी सिनेजगतातील कलाकारही सहभागी होती. अभिनेत्री रेश्मा शिंदेनेही आपल्या वडिलांच्या आठवणी शेअर करणारी पोस्ट केली होती. जी सध्या सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल होताना दिसत आहे. काय आहे ती पोस्ट चला जाणून घेऊ. 

दिनांक १९ मार्च हा दिवस जगभरात जागतिक पितृदिन म्हणून साजरा केला गेला. अनेकांनी आपल्या वडिलांच्या खास आठवणी सोशल मीडियावरुन सांगितल्या होत्या. यामध्ये मराठी चित्रपटजगतातील कलाकार मंडळींचाही मोठा सहभाग होता. मराठी अभिनेत्रींच्या फादर्स डे स्पेशल पोस्टचा सोशल मीडियावर महापूर आल्याचे पाहायला मिळाले होते. यामध्ये अमृता खानविलकर ते सोनाली कुलकर्णी सर्वांनीच खास पोस्ट करत आपल्या भावना व्यक्त केल्या होत्या. सध्या अभिनेत्री रेश्मा शिंदेचीही सोशल मीडिया पोस्ट चांगलीच व्हायरल होत आहे ज्यामध्ये तिने आपल्या वडिलांची खास आठवण सांगितली आहे.

 

 

View this post on Instagram

 

A post shared by Reshma Shinde (@reshmashinde02)

 

‘रंग माझा वेगळा’ मालिकेतून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री म्हणजे रेश्मा शिंदे. रेश्मा सोशल मीडियावरही नेहमीच सक्रिय असते. रेश्माची फादर्स डे स्पेशल पोस्ट सध्या व्हायरल होत आहे ज्यामध्ये तिने “माझ favourite गाण आहे. जेंव्हा जेंव्हा मी हे गाण ऐकल आहे तेंव्हा तेंव्हा मी खूप emotional झाले आहे. Happy Father’s DAY Baba
आणि बाबा ऑन ड्युटी असताना बाबाच्या जागी खंबीरपणे सगळ्या जबाबदाऱ्या उचलणाऱ्या माझ्या आई ला ही” असे म्हणत एक खास फोटोही शेअर केला आहे.  सध्या रेश्माची ही पोस्ट सर्वत्र तुफान व्हायरल होत आहे. यावर चाहत्यांच्याही सुंदर प्रतिक्रिया पाहायला मिळत आहेत.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Latest Post