Saturday, February 22, 2025
Home मराठी ‘ये वतन वतन मेरे आबाद रहे तू’, गाण्यावर डान्स करत रिंकूने दिल्या स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा; तुम्हीही पाहा

‘ये वतन वतन मेरे आबाद रहे तू’, गाण्यावर डान्स करत रिंकूने दिल्या स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा; तुम्हीही पाहा

नागराज मंजुळे यांच्या ‘सैराट’ या चित्रपटातून प्रेक्षकांचे भरभरून मनोरंजन करणारी मराठमोळी अभिनेत्री म्हणजे रिंकू राजगुरू. त्यांचा हा चित्रपट महाराष्ट्रभर गाजला होता. या नवीन अभिनेत्रीला प्रेक्षकांनी चांगलाच प्रतिसाद दिला होता. या चित्रपटातील तिचे आर्ची नावाचे बिनधास्त आणि बेधडक पात्र सर्वांना भावले होते. सध्या ती तिच्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात सक्रिय असेल. तिचे फोटो आणि व्हिडिओ ती सातत्याने शेअर करत असते. आर्चीच्या लूकमध्ये कमालीचा बदल आला आहे. अशातच रविवारी (१५ ऑगस्ट) सर्वजण ७५ वा स्वातंत्रदिन साजरा करत आहेत. त्यामुळे रिंकूनेही तिच्या चाहत्यांना स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

रिंकूने तिच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवरून एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये तिने पांढऱ्या रंगाचा ड्रेस आणि त्यावर मिश्र रंगाची ओढणी घेतली आहे. या व्हिडिओच्या बॅकग्राऊंडला ‘ये वतन वतन मेरे आबाद रहे तू’ हे गाणे वाजत आहे. तिचा हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. तिचे चाहते देखील तिला स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा देत आहेत. (marathi actress rinku rajguru give wishesh on independence day)

हा व्हिडिओ शेअर करून तिने लिहिले आहे की, “मन, आत्मा आणि शरीरात स्वातंत्र्य असू द्या. तुमच्या शब्दांवर विश्वास आणि तुमच्या स्वभावाचा अभिमान असूद्यात. स्वातंत्र्यदिनाच्या हार्दिक शुभेच्छा.”

रिंकूच्या कामाबद्दल बोलायचे झाल्यास, तिने वयाच्या पंधराव्या वर्षी २०१६ मध्ये चित्रपटसृष्टीमध्ये प्रवेश केला. तिने ‘सैराट’ या चित्रपटातून चित्रपटसृष्टीत पाऊल टाकले. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर शंभर कोटी पेक्षाही जास्त कमाई केली होती. तसेच या चित्रपटाचा हिंदीमध्ये ‘धडक’ नावाचा रिमेक देखील झाला होता. त्यानंतर तिने ‘कागर’ आणि ‘मेकअप’ या चित्रपटात काम केले आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-स्वातंत्र्यदिनानिमित्त चाहत्याने शेअर केला बिग बींचा ‘असा’ फोटो; ते पाहून अभिनेत्यालाही द्यावी लागली प्रतिक्रिया

स्वातंत्र्यदिन विशेष!! जेव्हा भारतातील ‘या’ चित्रपटांना घाबरला होता पाकिस्तान, थेट घातली गेली त्यावर बंदी

बॉलिवूडमधील असे कलाकार ज्यांना लाभलीय लष्करी पार्श्वभूमी; सुष्मितापासून ते प्रियांकापर्यंत ‘यांचा’ आहे समावेश

हे देखील वाचा