‘दो घूँट मुझे भी पिला दे शराबी’ गाण्यावर सईचा साडी घालून भन्नाट डान्स, एकदा पाहाच


सोशल मीडिया आपल्या आयुष्यात आल्यापासून आपण कलाकारांच्या खूपच जवळ आलो आहोत. कलाकार देखील फॅन्सच्या संपर्कात राहण्यासाठी सतत सोशल मीडियावर वेगवेगळ्या पोस्ट शेअर करतात. सिनेमासोबतच सोशल मीडियाच्या माध्यमातून कलाकार प्रसिद्धी मिळवतात. असे अनेक कलाकार आहेत, जे चित्रपटातून ब्रेक घेतल्यानंतर सोशल मीडियाच्या माध्यमातून फॅन्सच्या संपर्कात राहतात. अशीच मराठी आणि हिंदीमधील एक अभिनेत्री म्हणजे सई लोकूर.

लग्नानंतर सईने चित्रपटांमधून ब्रेक घेतला असला, तरीही ती सोशल मीडियाच्या माध्यमातून नेहमी तिचे फोटो आणि व्हिडिओ शेअर करून सर्वांच्या संपर्कात राहते. नुकताच सईने आपल्या इंस्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. ज्यात ती लाल रंगाची साडी नेसून ‘दो घूँट मुझे भी पिला दे शराबी’ या गाण्यावर डान्स करताना दिसत आहे. या साडीवर तिने लाल बांगड्या आणि लाल रंगाचे कानातले घातले आहे. तिचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच लोकप्रिय ठरत आहे. अगदी कमी वेळातच या व्हिडिओला ७० हजारांपेक्षाही अधिक व्ह्यूज मिळाले आहेत.

सई सध्या न चुकता रोजच सोशल मीडियावर तिचे व्हिडिओ पोस्ट करताना दिसत आहे. कधी ती साडीतील पारंपारिक अंदाजातील फोटो शेअर करते, तर कधी ग्लॅमरस आणि बोल्ड अंदाजातील वेस्टर्न ड्रेस घालून व्हिडिओ पोस्ट करते. सईचे प्रोफाइल पाहिले, तर त्यावर तिचे ‘एक से बढकर एक’ असे अनेक व्हिडिओ आपल्याला पाहायला मिळतील.

सई लोकूरने ‘मिशन चॅम्पियन’ या मराठी चित्रपटातून तिच्या अभिनयाची सुरुवात केली होती. सईने बिग बॉस मराठीच्या पहिल्या पर्वामध्ये सहभाग नोंदवला होता. यामध्ये तिला प्रेक्षकांची प्रचंड पसंती मिळाली. ती या घरात संपूर्ण १०० दिवस टिकून होती.

सईने मराठीसोबतच हिंदीमध्ये देखील काम केले आहे. ती कपिल शर्माच्या ‘किस किस किसको प्यार करू’ या सिनेमात कपिल शर्माच्या बायकोच्या भूमिकेत दिसली होती.

सईने मागच्या वर्षी बेळगाव येथे तिर्थदीप रॉयसोबत लग्न करत तिच्या वैवाहिक जीवनाला सुरुवात केली. ती अनेकदा तिच्या नवऱ्यासोबतचे फोटो व्हिडिओ देखील पोस्ट करताना दिसते. मागच्या महिन्यात झालेल्या वटपौर्णिमेच्या दिवशी देखील तिने पारंपारिक वेशात तिची पहिली वटपौर्णिमा साजरी केली.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-खेसारी लाल यादवच्या ‘या’ गाण्यावर अभिनेत्री राणीने लावले जोरदार ठुमके; दिलखेचक अदांना चाहत्यांची पसंती

-पती राज कौशल यांच्या निधनानंतर पहिल्यांदाच घराबाहेर दिसली मंदिरा बेदी, आईसोबतचा व्हिडिओ तुफान व्हायरल

-‘…ती सई चोर आहे’, म्हणत मोठ्या बहिणीच्या व्यथा मांडताना दिसली मृण्मयी; सोबतच गौतमीवर लावले तिने गंभीर आरोप


Leave A Reply

Your email address will not be published.