संस्कृती अडकणार लग्नबंधनात? सोनालीच्या भावासोबतचा फोटो पाहून चाहत्यांच्या कमेंट्स

Marathi Actress Sanskruti Balgude Shares Photoshoot With Actress Sonalee Kulkarni Brother Atul Kulkarni


मराठी विश्वातलं देखणं रूप म्हणजेच अभिनेत्री ‘संस्कृती बालगुडे’ होय. कोणत्या ना कोणत्या कारणामुळे माध्यमांचे लक्ष वेधणारी संस्कृती आता एका वेगळ्याच गोष्टीमुळे चर्चेत आली आहे. ती नेहमीच आपले फोटोशूट सोशल मीडियावर शेअर करताना दिसते. अशातच तिने एक नवीन फोटोशूट केले आहे. हे फोटोशूट तिने मॉडेल अतुल कुलकर्णीसोबत केले आहे. हे नाव वाचून जरा प्रश्न पडला असेल, परंतु अतुल हा ‘अप्सरा’ सोनाली कुलकर्णी हिचा भाऊ आहे. या दोघांचे हे फोटोशूट सर्वांचेच लक्ष वेधून घेताना दिसत आहे.

संस्कृतीने आपल्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवर हे फोटोशूट शेअर केले आहे. यामध्ये नवरीच्या रूपातील फोटोशूटमुळे चाहत्यांनी ‘संस्कृती लग्नबंधनात अडकणार का?’ असा प्रश्न विचारण्यास सुरुवात केली आहे.

संस्कृतीचे हे फोटोशूट रॉयल वेडिंग कलेक्शनसाठी करण्यात आले आहे. यासाठी तिने नवरीचे रूप घेतले आहे. तिच्या अंगावर सुंदर अलंकार वापरले आहेत, त्यामुळे तिचं रूप अगदी खुलून दिसत आहे. संस्कृतीसोबत दिसणारा मॉडेल अतुल कुलकर्णी याचीही भलतीच चर्चा रंगलीय. यावर अनेक प्रश्नांचा पाऊस पडत आहे. असे असले, तरीही संस्कृतीने आधीच हुशारी दाखवत आपल्या कॅप्शनमध्ये स्पष्टीकरण दिले आहे.

चाहत्यांना जरी संस्कृतीच्या लग्नाबाबत प्रश्न पडला असले, तरीही तिने “हे फक्त एक फोटोशूट आहे. माझा साखरपुडा झाला नाहीये, आणि लग्न तर नक्कीच करत नाहीये,” अशा आशयाचे कॅप्शन नोट करून दिले आहे.

अतुल हा ‘अप्सरा’ सोनाली कुलकर्णीचा लहान भाऊ होय. त्यानेदेखील आपल्या बहिणीप्रमाणे कलाविश्वात आपले नशीब आजमावले आहे. त्याने यापूर्वीही मॉडेलिंग केले आहे. अतुलनेही आपल्या इंस्टाग्राम अकाउंटवर संस्कृतीसोबतचे फोटो शेअर केले आहेत.

यामध्ये दाढीतील त्याचा लूक जबरदस्त दिसत आहे. विशेष म्हणजे एकत्र दिसण्याची ही या जोडीची पहिलीच वेळ नाहीये. यापूर्वीही ते ‘धरला माझा हात’ या गाण्यात एकत्र दिसले होते.

संस्कृतीने सन २०११ साली ‘पिंजरा’ या मालिकेतून आपले पदार्पण केले होते. यासोबतच तिने सन २०१४ साली ‘माकडाचं लगीन’ या चित्रपटातून मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण केले होते. यासोबतच तिने ‘सांगतो ऐका’ (२०१४), ‘शॉर्टकट’ (२०१५), ‘शिनमा’ (२०१५), ‘दमलेल्या बाबाची कहाणी’ (२०१६), ‘निवडुंंग’ (२०१६), ‘शिव्या’ (२०१७), ‘एफ यू: फ्रेंडशिप अनिलिमिटेड’ यांसारख्या चित्रपटातही काम केले आहे. सन २०१९ साली आलेल्या ‘सर्व लाईन व्यस्त आहेत’ या चित्रपटासाठी तिला ओळखले जाते.

विशेष म्हणजे संस्कृतीचा जन्म पुण्यातला असून तिने आपले शिक्षणही पुण्यातून पूर्ण केले आहे.

दैनिक बोंबाबोंचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-‘कष्टाला पर्याय नाही’, पण काम मिळण्यासाठी हवे बक्कळ फॉलोअर्स; असे आम्ही नाही तर सांगतेय ‘ही’ अभिनेत्री

-मूर्ती लहान पण कीर्ती महान! वयाच्या चौथ्या वर्षी बनला होता ‘डीजे’, पाहा व्हायरल होणारा आर्चचा व्हिडिओ

-तापसी पन्नूचं ‘आयटम साँग’ पाहिलंय का? व्यंकटेशच्या चित्रपटात दिसली होती बोल्ड रूपात, पाहा व्हिडिओ


Leave A Reply

Your email address will not be published.