‘सर्व मंगल मांगल्य’, म्हणत सायली संजीवने गौराईसोबतचा सुंदर फोटो केला शेअर


मराठी टेलिव्हिजवरील ‘काहे दिया परदेस’ या मालिकेतून नावारूपाला आलेली अभिनेत्री सायली संजीव. सायलीने या मालिकेमध्ये काम करून प्रेक्षकांच्या मनात तिचे एक वेगळे स्थान निर्माण केले आहे. तसेच चित्रपटात देखील तिने काम केले. त्यामुळे तिचा चाहता वर्ग खूप मोठा आहे. सोशल मीडियावर देखील खूप मोठ्या प्रमाणात सक्रिय असते. सध्या सर्वत्र गौरी गणपतीचा सण चालू आहे. अनेक कलाकार त्यांच्या गौरी गणपतीसोबत सोशल मीडियावर फोटो शेअर करत आहेत. अशातच सायलीने देखील तिच्या घरातली गौरी गणपतीसोबत फोटो शेअर केले आहेत.

सायलीने अलीकडेच अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवरून फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये तुम्ही पाहू शकता की, सायली तिच्या घरातील गौरी गणपती समोर बसलेली दिसत आहे. या फोटोमध्ये सायली खूपच सुंदर दिसत आहे. तिने लाल रंगाची साडी घातली आहे आणि यावर हिरव्या रंगाचा ब्लाऊज घातला आहे. तसेच नाकात नथ घातली आहे. खांद्यावर पदर घेऊन ती पोझ देताना दिसत आहे. (Marathi actress sayali sanjeev share a photos with gaurai on social media)

हा फोटो शेअर करून तिने लिहिले आहे की, “सर्व मंगल मांगल्य, शिवे सर्वार्थ साधिके. शरण्ये त्रंबके गौरी, नारायणी नमोस्तुते.” तिने शेअर केलेल्या या फोटोवर सुबोध भावे आणि ऋतुजा बागवे यांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. तसेच बाकी अनेक चाहते देखील तिच्या गौराईचे कौतुक करत आहेत.

अभिनेत्रीने चित्रपटसृष्टीतही काम केले आहे. तिने ‘पोलीस लाईन’, ‘आटपाडी नाईट्स’, ‘मन फकीरा’, ‘सातारचा सलमान’, ‘एबी आणि सीडी’, ‘झिम्मा’, ‘गोष्ट एका पैठणीची’ अशा मराठी चित्रपटामध्ये अभिनय करून रसिकांची मने जिंकली आहे. सायली सध्या कलर्स मराठीवरील ‘शुभमंगल ऑनलाईन’ या मालिकेत सुयश टिळकसोबत काम करत आहे.

दैनिक बोंबाबोंचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-विद्युत जामवालने ताजमहालला साक्षी ठेवत गर्लफ्रेंडसोबत कमांडो’ स्टाईलमध्ये केला साखरपुडा

-लॉकडाऊनमध्ये दरदिवशी कंगनावर नोंदवले जायचे २०० हून अधिक एफआयआर, अभिनेत्रीने स्वतः केला खुलासा

-अमेरिकन गायिका ब्रिटनी स्पीयर्स पुन्हा एकदा अडकणार लग्नबंधनात, अवघ्या ५५ तासांत तोडले होते पुर्वीचे लग्न


Leave A Reply

Your email address will not be published.