×

मे महिना होणार आणखी खास, ‘हे’ मराठी चित्रपट मनोरंजन करणार भरमसाठ

मे महिना म्हणजे सुट्टीचा महिना. मुलांना या महिन्यात शाळेला आणि कॉलेजला सुट्टी असते. त्यामुळे या महिन्यात नक्की काय करावे असा प्रश्न अनेकांना पडतो. या दिवसात प्रचंड ऊन असल्याने मैदानी खेळ खेळता येत नाही. यावर उत्तम पर्याय म्हणजे घरात बसून टीव्ही पाहणे. त्यामुळे अनेक नवनवीन चित्रपट पाहणे हा आधीपासूनच अनेकांना आवडता छंद असतो. या वर्षी देखील आपला उन्हाळा मनोरंजनात्मक जाणार आहे. कारण या वर्षी देखील अनेक नवीन मराठी चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. ज्यामुळे सगळ्यांची उन्हाळ्याची सुट्टी अगदी आनंदात जाणार आहे यात काही शंका नाही. चला तर मग जाणून घेऊया या वर्षी मे महिन्यात कोण कोणते मराठी चित्रपट प्रदर्शित होणार आहेत.

चंद्रमुखी
अमृता खानविलकर आणि आदिनाथ कोठारे मुख्य भूमिकेत असणारा हा चित्रपट २९ एप्रिलला प्रदर्शित झाला आहे. मे महिना सुरु होण्याआधी या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर बाजी मारली आहे. या चित्रपटाच्या ट्रेलरला जोरदार प्रतिसाद मिळाला आहे. तसेच आता चित्रपट देखील प्रेक्षकांना पसंत पडत आहे. कलाकारांनी या चित्रपटाचे प्रमोशन देखील दणक्यात केले आहे. त्यामुळे हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर धमाल करेल याची सर्वांना खात्री आहे.

तिरसाट
दिग्दर्शक प्रतिक टोणगे आणि मंगेश शेंडगे यांच्या ‘तिरसाट’ चित्रपटाची सध्या सगळीकडेच चर्चा पाहायला मिळत आहे. या चित्रपटाचा पोस्टर प्रदर्शित झाला आहे. निरज सुर्यकांत आणि तेजस्विनी शिर्के ही नवीन जोडी सिने जगतात पदार्पण करत आहे. चित्रपटाचा पोस्टर आणि गाणी यावरुन यामध्ये भन्नाट प्रेमकथा पाहायला मिळणार असल्याचे दिसत आहे. हा चित्रपट येत्या २० मे रोजी सर्वत्र प्रदर्शित होणार आहे. प्रेक्षकांना या चित्रपटाची उत्सुकता लागली आहे.

दिल दिमाग और बत्ती
आपल्याला ८०-९० दशकाची आठवण करून देणारा हा ‘दिल दिमाग और बत्ती’ चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणारे आहे. चित्रपट सृष्टीच्या गोल्डन एराला ट्रिब्यूट देण्यासाठी हा चित्रपट बनवला आहे. चित्रपटाचा पोस्टर अगदी रंगीबेरंगी आणि आकर्षक दिसत आहे. चित्रपटाचा ट्रेलर देखील खूपच सुंदर आहे. खास गोष्ट म्हणजे या चित्रपटात २० मराठी कलाकार असणार आहेत. येत्या ६ मे रोजी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे.

सरसेनापती हंबीरराव
सरसेनापती हंबीरराव या चित्रपटाची मागील अनेक दिवसापासून चर्चा चालू आहे. या चित्रपटात प्रवीण तरडे मुख्य भूमिकेत दिसणार आहे. चित्रपटाचा टिझर आणि पोस्टर प्रदर्शित झाले आहे. प्रेक्षक देखील या चित्रपटाची आतुरतेने वाट आहेत. हा चित्रपट येत्या २७ मे रोजी सर्वत्र प्रदर्शित होणार आहे.

धर्मवीर- मुक्काम पोस्ट ठाणे
प्रविण तरडे (Pravin Tarde) दिग्दर्शित आणि प्रसाद ओक (Prasad Oak) स्टारर ‘धर्मवीर- मुक्काम पोस्ट ठाणे’ हा आनंद दिघे यांच्या जीवनावर आधारित बहुचर्चित चित्रपटाची देखील जोरदार चर्चा चालू आहे. या चित्रपटाची तारीख अजून समोर आली नाही तरी देखील हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा-

 

Latest Post