Saturday, August 9, 2025
Home मराठी आपल्या आवाजाने प्रेक्षकांना मंत्रमुग्ध करणाऱ्या आर्या आंबेकरने फोटो केले शेअर; पाहून हरपले चाहत्यांचे भान

आपल्या आवाजाने प्रेक्षकांना मंत्रमुग्ध करणाऱ्या आर्या आंबेकरने फोटो केले शेअर; पाहून हरपले चाहत्यांचे भान

चित्रपटसृष्टीमध्ये ‘ब्युटी विद टॅलेंट’ खूप कमी अभिनेत्रींमध्ये पाहायला मिळते. यातीलच मराठी चित्रपटसृष्टीतील आघाडीची गायिका आणि अभिनेत्री म्हणजे आर्या आंबेकर होय. आपल्या सुरांनी प्रेक्षकांना मंत्रमुग्ध करण्यासाठी आणि सौंदर्याने सर्वांना वेड लावण्यासाठी आर्या नेहमीच सज्ज असते. ‘सारेगामापा लिटिल चॅम्प्स’मधून नावारुपाला आलेली आर्या खूपच सुंदर दिसते. तिच्या अदा पाहून कोणीही स्वतःला तिच्या प्रेमात पडण्यापासून थांबवू शकत नाहीत. अशातच लाखोंना भुरळ घालणारा तिचा एक फोटो समोर आला आहे.

आर्याने नुकताच सोशल मीडियावर तिचा एक फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये तुम्ही पाहू शकता की, तिने लाल आणि पिवळ्या रंगाचा ड्रेस घातला आहे. तिने लाल रंगाचा ब्लाऊज, पिवळ्या आणि लाल मिक्स रंगाचा स्कर्ट घातला आहे. याबरोबरच स्कर्टला मॅचिंग लाँग जॅकेट घातले आहे. गळ्यात एक छोटासा नेकलेस घातला आहे. तसेच सगळे केस मोकळे सोडले आहेत. (Marathi singer aarya ambekar share her photo on social media)

तिच्या एका चाहत्याने तिच्या या फोटोवर “टेडी बेअर,” अशी कमेंट केली आहे. तसेच तिच्या अनेक चाहत्यांना तिचा ड्रेस खूप आवडला आहे. अनेकजण तिच्या या लूकचे खूप कौतुक करताना दिसत आहेत. तिच्या या फोटोला आतापर्यंत दीड लाखापेक्षाही जास्त लाईक्स मिळाले आहेत. तसेच सातत्याने फोटोवर कमेंट करून तिचे कौतुक करत आहेत.

खरं तर, तिचा हा लूक ‘सारेगामापा’ या शोमधील आहे. आर्या सध्या झी मराठीवरील ‘सारेगामापा लिटिल चॅम्प्स’ या शोचे परीक्षण करत आहे. ज्या शोने तिला ओळख निर्माण करून दिली, आज त्याच शोचे परीक्षण करणे ही आर्यासाठी एक गर्वाची गोष्ट आहे. या शोमध्ये तिच्यासोबत रोहित राऊत, कार्तिकी गायकवाड, मुग्धा भगवान, प्रथमेश लघाटे हे परीक्षकांच्या भूमिकेत आहेत.

आर्याने मराठी संगीत क्षेत्राला अनेक गाणी दिली आहेत, तिने ‘जरा जरा’, ‘हृदयात वाजे समथिंग’, ‘कितीदा नव्याने’, ‘ओ साजणा’ यांसारखी गाणी गायली आहेत. यासोबतच तिने अनेक मालिकांचे टायटल सॉंग्स गायले आहेत. तसेच तिने ‘ती सध्या काय करते’ या चित्रपटातही काम केले आहे.

दैनिक बोंबाबोंचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-नेहमीपेक्षा वेगळ्या लूकमध्ये दिसला ‘सिद्धू’, फोटो पाहून चाहता म्हणाला, ‘मराठी शाहरुख’

-‘या’ तीन अभिनेत्रींनी केला ‘मनिके मागे हिते’ गाण्यावर जबरदस्त डान्स, शेवट पाहायला विसरू नका

-‘सौंदर्य ही शक्ती, तर स्माईल त्याची तलवार!’ वैदेही परशुरामीचे रूप पाहुन हरपले चाहत्यांचे भान

हे देखील वाचा