धक्कादायक! मराठी मालिकेतील ‘या’ अभिनेत्रीला अनोळखी व्यक्तींकडून मारहाण, शेअर केला व्हिडिओ

Marathi TV Serial Karbhari Laybhari Actress Ganga Aka Pranit Hate Beaten Unknown People


बॉलिवूडपासून ते हॉलिवूडपर्यंत अनेक कलाकारांसोबत गैरवर्तणूक झाल्याचे आपण ऐकले, पाहिले असेल. असेच काहीसे मराठी कलाकारासोबत घडले आहे. झी मराठी चॅनेलवरील ‘कारभारी लयभारी’ या मालिकेतील अभिनेत्रीला अनोळखी व्यक्तींनी मारहाण केल्याची बातमी समोर येत आहे. अभिनेत्रीने सोशल मीडियावरून याबाबत माहिती दिली आहे.

टान्सजेंडर असलेली अभिनेत्री गंगा (प्रणित हाटे) हिने आपल्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवर व्हिडिओ शेअर केला आहे. ती या व्हिडिओत खूप घाबरलेली दिसत आहे.

तिने व्हिडिओत म्हटले की, “मी एका बस स्टॉपवर बसची वाट पाहत उभी होते. त्यावेळी काही मुले तिथे आली आणि त्यांनी विनाकारण मला मारहाण केली. मला काहीच कळत नाहीये की मी काय करू आणि कोणाची मदत घेऊ. कृपया करून मला सांगा.”

हे सर्व घडल्यानंतर ती तिथून पळाली आणि तिने रिक्षा पकडली. यानंतर तिने रिक्षामध्ये बसल्यावर हा व्हिडिओ काढला. पुढे काय केले पाहिजे, याबद्दल ती सोशल मीडियावर मदत मागत आहे. गंगाला ही मारहाण कोणी आणि का केली हे सध्या अस्पष्ट आहे.

गंगा झी युवावरील ‘डान्सिंग क्वीन’ या शोमधून अवघ्या महाराष्ट्रासमोर आला. रियॅलिटी शोमुळे ती आज घराघरात पोहचली आहे. तिला स्वत:ची ओळख निर्माण करण्यासाठी खूप संघर्ष करावा लागला होता. ट्रान्सजेंडर असल्यामुळे तिला यापूर्वीही अनेक समस्यांचा सामना करावा लागला होता. तिने याच शोच्या मंचावर आपल्याला झालेला त्रास सर्वांसमोर मांडला होता.

तिची मराठी चित्रपटसृष्टीतील कलाकारांशी चांगली मैत्री झाली आहे. यामध्ये धनश्री काडगावकर, अंकुश चौधरी यांसारख्या कलाकारांचाही समावेश आहे.

दैनिक बोंबाबोंचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-व्हिडिओ: ५ वर्षे रिसर्च करून बनवलेला दाक्षिणात्य चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला, बॉलिवूड अभिनेता अर्जुन कपूरने केला टिझर शेअर

-बॉलिवूड अभिनेत्री उर्वशीने कापले १० किलो कांदे, चारच तासात व्हिडिओला मिळाले १९ लाखांपेक्षा अधिक व्ह्यूज

-अबब! उर्वशी रौतेलाचा ५० लाखांचा बोल्ड अँड ब्युटीफुल लुक, पाहा या लूकचे दोन खास व्हिडीओ


Leave A Reply

Your email address will not be published.