मौनी रॉयचे बोल्ड अंदाजातील फोटो पाहून चाहत्यांच्या काळजाचा चुकला ठोका

मौनी रॉय ही बॉलिवूडमधील एक गाजलेली अभिनेत्री आहे. आपल्या चाहत्यांचे मन जिंकण्यात ती कोणतीच कसर सोडत नाही. ती कामातून वेळ काढून सोशल मीडियावर देखील सक्रिय असताना दिसते. तिच्या आयुष्यातील प्रत्येक गोष्ट आणि प्रत्येक घटना ती सोशल मीडियावर शेअर करत असते. त्यामुळे ती सर्वत्र खूपच प्रसिद्ध आहे. तिचा प्रत्येक फोटो किंव्हा व्हिडिओ सोशल मीडियावर येत्या क्षणीच व्हायरल होत असतो. तिच्या नवीन स्टाईलमुळे ती सोशल मीडियावर नेहमीच ट्रेंड होत असते. तिच्या डान्सवर तर सगळे फिदाचं होत असतात. अशातच चाहत्यांना भुरळ घालणारे तिचे काही फोटो समोर आले आहेत.

मौनीने सोशल मीडियावर तिचे काही फोटो शेअर केले आहेत. या फोटोमध्ये तिने अत्यंत ग्लॅमरस शॉर्ट ड्रेस घालून पायात हिल्स घातले आहेत. ती एका सोप्यावर बसून पोज देत आहे. या फोटोमध्ये ती खूपच हॉट दिसत आहे. तिचे अनेक चाहते या फोटोवर त्यांच्या प्रतिक्रिया देत आहेत. अनेकांना तिचा हा बोल्ड लूक खूप आवडला आहे. तिचे या फोटोवर हार्ट तसेच फायर ईमोजी पोस्ट करत आहेत. (mauni roy share her bold photos on social media)

View this post on Instagram

A post shared by mon (@imouniroy)

मौनी रॉयच्या कामाबद्दल बोलायचे झाल्यास, ती लवकरच अयान मुखर्जीचा ऍक्शन, ड्रामा चित्रपट ‘ब्रह्मास्त्र’ मध्ये दिसणार आहे. या चित्रपटात ती रणबीर कपूर, आलिया भट्ट, अमिताभ बच्चनसोबत दिसणार आहे. या आधी तिची ‘लंडन कॉन्फिडेन्सीअल‌’ ही वेबसीरिज प्रदर्शित झाली होती. तिच्या या वेबसीरिजला देखील प्रचंड प्रेम मिळाले आहे. तिने अक्षय कुमारच्या ‘गोल्ड’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. मौनीने ‘मेड इन चायना’ या चित्रपटात देखील महत्वाची भूमिका निभावली होती. तसेच तिला टेलिव्हिजनवरील ‘नागीन’ या मालिकेतून खूप ओळख मिळाली आहे. त्यामुळे सोशल मीडियावर तिचा चाहता वर्ग खूप मोठा आहे. तिच्या प्रत्येक फोटोला तिचे चाहते भरभरून प्रतिसाद देत असतात.

दैनिक बोंबाबोंमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-‘तुझी माझी जोडी जमली’, गाण्यावर मानसीने पतीसोबत धरला ठेका; पाहून तुम्हीही म्हणाल, ‘लय भारी’

-पिवळ्या रंगाच्या साडीत मितालीने दिल्या झक्कास पोझ; चाहताही म्हणाला, ‘खूप खूप जास्त सुंदर दिसताय’

-‘…खरचं साडीपेक्षा तू जास्त सुंदर दिसतेस’, श्रुती मराठेच्या फोटोवरील चाहत्यांची कमेंट ठरतेय लक्षवेधी

Latest Post