Friday, December 8, 2023

दु:खद! प्रसिद्ध अभिनेते मंगल ढिल्लोन यांचे निधन, सिनेसृष्टीत शोककळा

चित्रपट आणि टीव्ही मालिकांमधील प्रसिद्ध अभिनेते मंगल ढिल्लोन यांचे निधन झाले आहे. कर्करोगासारख्या गंभीर आजाराशी ते दीर्घकाळ झुंज देत होते. त्यांच्यावर लुधियाना येथील रुग्णालयात उपचार सुरू होते. काही दिवसांपासून त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात येत आहे. उपचारादरम्यान त्यांनी रविवारी अखेरची श्वास घेतला आहे.

मंगल (Mangal Dhillon) यांची प्रकृती सतत खालावत गेली आणि 11 जून रोजी त्यांचे निधन झाले. मंगल यांचा १८ जून रोजी वाढदिवस आहे, मात्र त्यापूर्वीच त्यांचे निधन झाले. मंगल हे पंजाबी चित्रपटसृष्टीतील एक प्रसिद्ध नाव होत. याशिवाय त्याने अनेक बॉलिवूड चित्रपट आणि टीव्ही मालिकांमध्ये काम करुन लोकांची मने जिंकली आहेत. 1988 मध्ये आलेल्या ‘खून भरी मांग’ या चित्रपटात ते छोट्या भूमिकेत दिसला होते. यानंतर ते मनोरंजन विश्वात सक्रिय झाले. (Famous Hindi and Punjabi film actor Mangal Dhillon passed away)

( हि बातमी अपडेट होत आहे.)

अधिक वाचा –
मोठी बातमी! अभिनेत्री रुबीना दिलैकचा अपघात; अभिनेत्री गंभीररित्या जखमी
फक्त सिद्धू मुसेवालाच नाही तर ‘या’ 5 कलाकारांचीही झालीये हत्या, एक होता धर्मेंद्रचा भाऊ । Sidhu Moose Wala Birthday

हे देखील वाचा