मिलिंद सोमण यांच्याशी वयातील अंतर आणि कुटुंब नियोजनावरील प्रश्नांवर अंकिताची बिनधास्त उत्तरे


बॉलिवूड अभिनेता आणि मॉडेल मिलिंद सोमण हे त्यांची पत्नी अंकिता कोनवार हिच्यासोबतचे त्यांचे फोटो आणि लव्हलाईफ यामुळे नेहमीच चर्चेत असतात. एन्टरटेन्मेंट दुनियेत हे जोडपं त्यांच्या फिटनेसमुळे चर्चेत असते. आता पुन्हा या कपलबद्दल सर्वत्र चर्चा चालू आहे. मागील काही दिवसांपूर्वी अंकिताचे इंस्टाग्रामवर ‘आस्क मी एनिथींग’ हे सेशन चालू होते. यामध्ये तिच्या चाहत्यांनी तिला तिच्या वैयक्तिक आयुष्याबाबत काही प्रश्न विचारले यावर तिने बिंनधास्तपणे उत्तरे दिली.

अंकिताला एका युजरने विचारले की, “जेव्हा तुमचे लग्न होणार होते, तेव्हा अनेकांनी तुम्हाला हा सल्ला दिला होता की, तुमच्यापेक्षा जास्त वय असलेल्या व्यक्तीशी लग्न करू नका. या सगळ्या गोष्टींना तुम्ही कसे मॅनेज केले होते.?”

अंकिताने या प्रश्नाला उत्तर देताना लिहिले होते की, “भलेही आपल्या सोसायटीमध्ये या सगळ्या गोष्टी नॉर्मल नाहीत. पण याबाबत बोलायला लोकांना खूप आवडते. ही केवळ भारतातील गोष्ट नाहीये पण लोकांची सवयच आहे ही. जेव्हा लोकांना एखादी गोष्ट आवडत नाही, तेव्हा ती गोष्ट रिजेक्ट करतात. मी नेहमी तेच करते ज्यामुळे मला आनंद होतो.”

या दोघांच्या लग्नाला नुकतेच 3 वर्ष पूर्ण झाले आहेत. यातच एका युजरने तिला फॅमिली प्लॅनिंग बाबत प्रश्न विचारले आहेत. याला उत्तर देताना तिने सांगितले की, “आम्ही एक नियोजित कुटुंब आहोत.” अंकिताचे हे उत्तर आता सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे.

मिलिंद आणि अंकिताने 22 एप्रिल, 2018 रोजी लग्न केले होते. पण त्या दोघांच्या वयातील अंतरामुळे ते खूपच चर्चेत आहेत. त्या दोघांच्या वयामध्ये 26 वर्षाचे अंतर आहे. त्या दोघांनी एका मुलाखतीत त्यांच्या वयातील अंतरावरून सांगितले की, “यात हैराण होण्यासारखे काहीच नाहीये. पारंपरिक पद्धतीने समाजाने काही मर्यादा घालून दिल्या आहेत. त्या काही गोष्टींवर आधारित आहे. त्या जात, धर्म, देश, लिंग या गोष्टींवर आधारित आहे. पण मला वाटते लग्नामध्ये कोणतीच बाधा आली नाही पाहिजे. प्रत्येकाला आपल्या गोष्टी निवडण्याचा पूर्ण अधिकार असला पाहिजे. आपल्या गोष्टी केवळ आपल्या भावनांवर आधारित असल्या पाहिजे. मग समाजाशी काही देणे घेणे नसले तरी चालेल.”

मिलिंद सोमण हे त्यांच्या फिटनेसमुळे खूप चर्चेत असतात. त्यांचे फिटनेस व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. तसेच अंकिता देखील सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात सक्रिय असते.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-परिणीती चोप्राचा समुद्र किनाऱ्यावरील ग्लॅमरस फोटो व्हायरल, बहीण प्रियांका चोप्राचा असा झाला जळफळाट

-उर्वशी रौतेलाकडून मोठी चूक; तब्बल ७२ तासांपासून वाट पाहणाऱ्या चाहत्यांची अभिनेत्रीने हात जोडून मागितली माफी

-आहा कडकच ना! ‘लुट गए’ गाण्यावर पोरीचा जबरदस्त डान्स, मिळाले १ कोटीपेक्षाही अधिक व्ह्यूज


Leave A Reply

Your email address will not be published.