Monday, March 17, 2025
Home मराठी इंडिव्हिज्युअल गायक, संगीतकारांचा होणार मोठा सन्मान; पुण्यात रंगणार MIMA पुरस्कार सोहळा

इंडिव्हिज्युअल गायक, संगीतकारांचा होणार मोठा सन्मान; पुण्यात रंगणार MIMA पुरस्कार सोहळा

मराठी सिनेसृष्टीमध्ये कलाकारांचा सन्मान करण्यासाठी अनेक पुरस्कार सोहळे होत असतात. कलाकारांच्या कलेचा आदर, सन्मान करण्यासाठी आणि पुढील नवीन कामासाठी त्यांना उत्तेजित करण्यासाठी हे पुरस्कार सोहळे आयोजित केले जातात. अशातच आता मराठी इंडस्ट्री मधील इंडिव्हिज्युअल गायक, गीतकार, संगीतकार यांचा सन्मान करणारा एक नवीन पुरस्कार सोहळा पार पडणार आहे. या पुरस्कार सोहळ्याचे नाव MIMA म्हणजेच मराठी इंडि म्युझिक अवॉर्ड असे आहे.

या मीमा (MIMA Award) पुरस्कार सोहळ्यामध्ये मराठी इंडस्ट्री मधील इंडिव्हिज्युअल गायक, संगीतकार, गीतकार यांचा सन्मान केला जाणार आहे. हा पुरस्कार सोहळा पुण्यामध्ये येत्या 9 मार्च 2024 रोजी पार पडणार आहे. महाराष्ट्र कला मंचातर्फे हा पुरस्कार सोहळा आयोजित करण्यात आलेला आहे. संगीत क्षेत्रातील अनेक दिग्गज कलावंत या पुरस्कार सोहळ्यात अवतरणार आहेत. आणि त्यांच्या संगीताची जादू आपल्याला पाहायला मिळणार आहे.

दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा 

हेही वाचा

विजय वर्मा आधी या लोकांशी जोडलं गेलंय तमन्ना भाटियाच नाव; जाणून घ्या संपूर्ण यादी
‘बाहुबली’ फेम अभिनेता एकेकाळी होता वेटर; जाणून घ्या त्याचा करिअर प्रवास

हे देखील वाचा