Tuesday, September 26, 2023

‘रोज मासे खा… ऐश्वर्या रायसारखे सुंदर व्हा’, भाजप सरकारच्या ‘या’ मंत्र्याचा तरुणांना अजब सल्ला

बाॅलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री आणि सर्वात सुंदर म्हणून ऐश्वर्या रायला ओळखले जाते. आपल्या सौंदर्याने आणि घाऱ्या डोळ्यांनी ती सर्वांना वेड लावते. ऐश्वर्या राय ही माजी मिस इंडिया विजेती आहे. मिस इंडियाचा मुकुट डोक्यावर घातल्यानंतर ऐश्वर्याने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. त्यांनतर तिच्या नितळ सौंदर्यामुळे ती चर्चेत आली. अगदी इंटरनॅशनल कलाकार देखील अनेक वेळा तिच्या सौंदर्याचे तोंड भरून कौतुक करत असतात. बॉलिवूडमध्ये तर तिची एक झलक पुरेशी आहे. त्यामुळे तिची फॅन फॉलोविंग देखील जबरदस्त होती. बॉलिवूडमधील अनेक कलाकार देखील तिच्या सौंदर्यावर भाळले होते. पण आता महाराष्ट्रातील एकनाथ शिंदे सरकारमधील मंत्री विजय कुमार गावित यांनी अजब विधान केले आहे.

भारतीय जनता पक्षाचे (भाजप) नेते विजय कुमार गावित (Vijay Kumar) यांनी म्हटले आहे की, “बॉलिवूड अभिनेत्री ऐश्वर्या राय (Aishwarya Rai ) रोज मासे खाते त्यामुळे तिचे डोळे सुदंर झाले आहेत. तुम्ही रोज मासे खाल तर तुमचे डोळे ऐश्वर्यासारखे सुंदर होतील, असा सल्लाही त्यांनी लोकांना दिला आहे. जे ऐकून खुद्द ऐश्वर्या रायलाही आश्चर्य वाटेल. होय… त्यांनी ब्युटी क्वीन ऐश्वर्या राय बच्चनबद्दल एक अजब विधान केले आहे. जे एका पत्रकाराने सोशल मीडियावर शेअर केले आहे. हे सोशल मीडियावर तूफान व्हायरल होत आहे.

पत्रकार सुधीर सूर्यवंशी यांनी एक ट्विट शेअर करताना लिहिले की, ‘महाराष्ट्राचे भाजप मंत्री विजय कुमार गावित म्हणाले की, बॉलीवूड स्टार ऐश्वर्या राय रोज मासे खाते त्यामुळे तिचे डोळे सुंदर आहेत. तरुणांनी मासे खावेत, मग ते आपोआपच स्मार्ट आणि सुंदर दिसतील. मगा तुम्हाला कुणालाही पटवणे सोपो जाईल,असा सल्ला त्यांनी दिला.” या ट्विटवर अनेक नेटरकरी कमेंट करत आहेत. भाजप सरकारवर अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत.

हे विधान समोर येताच सोशल मीडियावर युजर्सनी भाजपला टोमणे मारण्यास सुरुवात केली. अशोक शेखावत यांनी लिहिले की “भाजपच्या मंत्र्याची ही लज्जास्पद टिप्पणी आहे… भाजप तरुणांना कोणता मूर्खपणाचा सल्ला देत आहे?” अशा अनेक कमेंट यावर आल्या आहेत. (Minister Vijay Kumar Gavit in Eknath Shinde government has said that famous actress Aishwarya Rai eats fish everyday so her eyes have become beautiful)

अधिक वाचा- 
‘पद्म’ पुरस्कारासाठी सुधीर मुनगंटीवार करणार अशोक सराफांच्या नावाची शिफारस; अभिनेते म्हणाले…
तीन लेकरं पदरात असताना कनिका कपूरने घेतलेली सोडचिट्टी, 44व्या वर्षी पुन्हा बांधली लगीनगाठ

हे देखील वाचा