Wednesday, August 26, 2026
Home बॉलीवूड बेपत्ता मलीच्या शोधासाठी आईची धडपड, गांधारी चित्रपटाचा अंगावर काटा आणणारा ट्रेलर रिलीज

बेपत्ता मलीच्या शोधासाठी आईची धडपड, गांधारी चित्रपटाचा अंगावर काटा आणणारा ट्रेलर रिलीज

तापसी पन्नुच्या आगामी चित्रपट ‘गांधारी’ चा ट्रेलर रीलीज झाला आहे. हा ट्रेलर प्रेक्षकांना एका आईच्या भावनिक आणि ऍक्शनने भरलेल्य प्रवासाची झलक दाखवतो. या चित्रपटात तापसी पन्नुने बानीची भुमिका साकारली आहे. जीची लहान मुलगी अचानक बेपत्ता होते. त्यानंतर तिचे आयुष्य पुर्णपणे बदलुन जाते. या ट्रेलर नुसार असे वाटते आहे की, ही कथा एका आईची कथा सांगतो, तिच्या मुलीच्या वाटेला आलेल्या घटनेमुळे खचते आणि ती स्वत: कायदा आणि न्याय आपल्या हातात घेण्याचा निर्णय घेते. 

आपल्या मुलीला परत मिळवण्यासाठी एक आई कोणत्याही थराला जाऊ शकते. हे चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये अधोरेखित केले आहे. एका प्रभावी दृश्यात, बानी डोळ्यांवर पट्टी बांधून आपला शोध सुरू ठेवताना दिसते. या दृश्यातून हे स्पष्ट होते की, मुख्य पात्राला केवळ शारीरिकच नव्हे, तर मानसिक आणि भावनिक अडचणींचाही सामना करावा लागतो.

या चित्रपटात तापसी पन्नु सोडुन ईश्वक सिंग, छाया कदम, स्वस्तिका मुखर्जी, मीता वशिष्ठ आणि जतीन सरना यासारखे उत्तम स्टारकास्ट यामध्ये आहे. या चित्रपटाच्या निमित्तने तापसी पन्नू आणि प्रसिद्ध लेखिका-निर्मात्या कनिका ढिल्लन पुन्हा एकत्र आल्या आहेत. या जोडीने याआधी हसीन दिलरुबा आणि फिर आयी हसीन दिलरुबा यासारख्या उत्तम चित्रपटासांठी त्यांनी एकत्र काम केले आहेत.

गांधारी‘(Gandhari) हा चित्रपट 3 सप्टेंबर 2026 चित्रपटगृहांमध्ये  रिलीज न होता हा चित्रपट डाॅरेक्ट ओटीटीवर रीलीज होणार आहे. तर तुम्हाला भावनिक आणि ऍक्शन चित्रपटे आवडत असतील तर तुम्ही 3 सप्टेंबर 2026 पासुन नेटफ्लिक्सवर पाहु शकता.

हेही वाचा

अमिताभ बच्चन यांनी मागितली माफी, नंबरिंगच्या चुकीवर म्हणले – इथेही होतोय गडबड

हे देखील वाचा