अभिनेते मिथुन चक्रवर्ती यांच्या सुनेने केलेल्या डान्सचा ‘हा’ व्हिडिओ होतोय तुफान व्हायरल! एकदा पाहाच

अभिनेते मिथुन चक्रवर्ती यांच्या सुनेने केलेल्या डान्सचा 'हा' व्हिडिओ होतोय तुफान व्हायरल! एकदा पाहाच


बॉलिवूड कलाकार असो  किंवा मालिकक्षेत्रातील कलाकार असोत सततच्या चित्रीकरणामुळे थोडासा जरी वेळ मिळाला तरी हे कलाकार त्यातून स्वतःचा आनंद शोधण्याचा प्रयत्न करत असतात. मग कुणी शॉर्ट व्हिडीओ बनवतं तर कुणी, डान्सच्या व्हिडीओ बनवतं तर कुणी गाण्याच्या…बॉलिवूडचे ज्येष्ठ अभिनेते मिथुन चक्रवर्ती स्वतः किती उत्तम डान्सर आहेत, हे प्रत्येकालाच ठाऊक आहे.

त्यांचे हे कलागुण जर त्यांच्या कुटुंबातील सदस्यांमध्ये जर नाही आढळले तरच नवल… डिस्को डान्सर मिथुन यांची सून आणि अभिनेत्री मदलसा शर्मा सध्या तिच्या एका व्हिडिओमुळे चर्चेत आहे. तीचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ स्वत: मदलसाने शेअर केला आहे, ज्यामध्ये ती मस्त डान्स करताना दिसत आहे.

मदालसा तिच्या सोशल नेटवर्किंग साइट इन्स्टाग्राम अकाउंटवर खूपच सक्रिय असते आणि या प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून ती तिच्या प्रियजनांशी नेहमीच जोडलेली राहते. मदलसा दररोज तिचे फोटोज आणि व्हिडिओज इथे शेअर करत असते.

यानुसार तिने तिचा एक नवीन व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यामध्ये ती ‘ओ ना ना’ या गाण्यावर थिरकताना दिसत आहे. तिच्या डान्स व्हिडिओवर चाहत्यांनी अक्षरशः लाईक्सचा पाऊस पाडला आहे. मदालसाचा हा व्हायरल व्हिडिओही आपणही पहा आणि एन्जॉय करा.

इन्स्टाग्रामवर मदलसाचे २ लाखाहून अधिक फॉलोअर्स आहेत. विशेष म्हणजे, मदलसा शर्मा आजकाल छोट्या पडद्यावर आपलं टॅलेंट दाखवताना दिसतेय. स्टार प्लसची प्रसिद्ध मालिका अनुपमामध्ये ती मुख्य भूमिका साकारतेय. या मालिकेत ती नकारात्मक भूमिका साकारत असून प्रेक्षक तिच्या या भूमिकेला बरीच पसंती देत ​​आहेत.

मदलसा शर्माने हिंदीपेक्षा दाक्षिणात्य चित्रपटांमध्ये अधिक काम केलं आहे. मदलसाने फिटिंग मास्टर, आलस्यम अमृताम, सम्राट अँड कंपनी, अँगल, पटियाला ड्रीम्स, थांबीक्कु इंधा ओरू अशा अनेक चित्रपटांमधून तिचं अभिनय कौशल्य आपल्याला दाखवलं आहेच.


Leave A Reply

Your email address will not be published.