नोरा फतेहीसोबत मिथुन चक्रवर्ती यांनी केला ‘कमरिया’ गाण्यावर डान्स, परिणीती आणि करण झाले अवाक

टेलिव्हिजनविश्वात सध्याच्या घडीला सर्वात जास्त गाजणारा रियॅलिटी शो म्हणजे ‘हुनरबाज.’ संपूर्ण देशाच्या कानाकोपऱ्यातून वेगवेगळ्या क्षेत्रातील प्रतिभा या शोच्या माध्यमातून संपूर्ण जगासमोर येत आहे. करण जोहर, मिथुन चक्रवर्ती आणि परिणीती चोप्रा हे तिघं या शोमध्ये परीक्षकांची भूमिका पार पडत असून, प्रत्येक आठवड्यात या शोमध्ये खास पाहुणे उपस्थित असतात. या आठवड्यातही या शोमध्ये ग्लॅमरचा तडका लावण्यासाठी नोरा फतेही उपस्थित असणार आहे. या शोमध्ये तिने स्पर्धकांचा परफॉर्मन्स एन्जॉय करताना स्वतःच देखील धमाकेदार डान्स केला. याचा एक प्रोमो चॅनेलने त्यांच्या सोशल मीडियावर शेअर केला आहे.

‘हुनरबाज: देश की शान’ शोचा एक नवीन प्रोमो प्रदर्शित केला असून, या प्रोमोमध्ये मिथुन चक्रवर्ती नोरा फतेहीसोबत तिच्या सुपरहिट अशा ‘कमरिया’ गाण्यावर धमाकेदार डान्स करताना दिसत आहे. या व्हिडिओमध्ये मिथुन चक्क नोराच्या डान्स स्टेप्स कॉपी करत असून, तिच्यासारखेच ते कंबर हलवताना दिसत आहे. वयाच्या ७१ व्या वर्षी मिथुनदांचा हा डान्स पाहून परिणीती आणि करण देखील हैराण झाले आहेत.

View this post on Instagram

A post shared by ColorsTV (@colorstv)

‘कमरिया’ हे नोराचे गाणे ‘स्त्री’ या सिनेमातील असून, या गाण्यात नोरासोबत राजकुमार राव (Rajkummar Rao) आहे. हा सिनेमा २०१८ साली प्रदर्शित झाला होता. नोराने तिच्या अभिनयाची सुरुवात ‘रोर: टाइगर्स ऑफ सुंदरबन्स’ चित्रपटापासून केली होती. मात्र नोराला तिच्या डान्समुळे मोठी लोकप्रियता मिळाली. नोरा फतेही ‘दिलबर’, ‘साकी साकी’, ‘नाच मेरी रानी’, ‘डान्स मेरी रानी’ आदी गाण्यांमधून अमाप लोकप्रियता मिळाली. मिथुन चक्रवर्ती यांच्याबद्दल सांगायचे झाले तर ते देखील त्यांच्या काळातील लोकप्रिय डान्सर होते. त्यांच्या डान्सिंगची अनोखी स्टाईल नेहमीच चर्चेत असायची.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा –

Latest Post