Friday, February 14, 2025
Home बॉलीवूड अभिनेते मिथुन चक्रवर्ती यांना पद्मभूषण पुरस्कार प्रदान, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी केला गौरव

अभिनेते मिथुन चक्रवर्ती यांना पद्मभूषण पुरस्कार प्रदान, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी केला गौरव

हिंदी चित्रपटसृष्टीतील दिग्गज अभिनेते मिथुन चक्रवर्ती (Mithun Chakraborty) यांना कला क्षेत्रातील विशेष योगदानाबद्दल पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. सोमवारी (२२ एप्रिल) राष्ट्रपती भवनात त्यांना हा सन्मान प्रदान करण्यात आला. त्याचबरोबर भारतीय पॉप क्वीन म्हणून प्रसिद्ध असलेल्या गायिका उषा उथुप यांनाही पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. गायिका तिच्या अतुलनीय आवाजासाठी आणि वैविध्यपूर्ण प्रदर्शनासाठी ओळखली जाते.

मिथुन हे हिंदी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेते आहेत. ‘मृगया’ या बंगाली चित्रपटातून त्यांनी आपल्या फिल्मी करिअरला सुरुवात केली. मृणाल सेन दिग्दर्शित या चित्रपटाने लोकांच्या हृदयात विशेष स्थान निर्माण करण्यात ते यशस्वी ठरले. 1976 मध्ये प्रदर्शित झालेल्या या चित्रपटासाठी त्यांना सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला होता.

1976 मध्ये त्यांनी बॉलिवूडमध्ये प्रवेश केला. त्यांचा पहिला हिंदी चित्रपट ‘दो अंजाने’ असे होते. दुलाल गुहा दिग्दर्शित या चित्रपटानंतर मिथुनने मागे वळून पाहिले नाही आणि एकापाठोपाठ एक उत्तम चित्रपटात काम केले. डिस्को डान्सर, प्यार झुकता नहीं, फूल और अंगार, दलाल, प्रेम प्रतिज्ञा, जंग आणि चंदाल यांसारख्या चित्रपटांतून त्यांनी प्रचंड लोकप्रियता मिळवली.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा-

…म्हणून भाऊ कदमने नाकारला हिंदी शो; म्हणाला, ‘इथे जेवढा मान मिळतो तेवढा तिकडे…’
व्हायरल फेक व्हिडिओ प्रकरणी रणवीर सिंगने केली कारवाई, पोलिसांत तक्रार दाखल

हे देखील वाचा