Friday, April 26, 2024

‘त्या’ घटनेने बदलले मिथूनदा यांचे आयुष्य, नक्षलवाद सोडून बनले बॉलिवूड सुपरस्टार

डिस्को डान्सर असं म्हटलं तरी डोळ्यांसमोर येतात मिथून चक्रवर्ती, म्हणजेच आपले मिथून दा. ८० आणि ९० चा दशक गाजवलेल्या मिथून दा यांना केवळ डान्समधूनच नाही, तर अभिनयातूनही मोठं यश मिळालं. ते त्याकाळी सर्वात लोकप्रिय अभिनेत्यांपैकी एक होते. मिथून दा यांचं स्टारडम केवळ तेवढ्या काळापुरतंच राहिलं असंही नाही बरं का. तर त्यांनी २००० नंतरही अनेक चित्रपटांमध्ये काम केलंय. अनेक रिऍलिटी शोमध्येही ते दिसलेच. पण एवढा मोठा सुपरस्टार म्हणजे त्याच्याबाबतीतले किस्सेही भन्नाट असणारच की. त्यातही अनेकांना हे माहित नसावं की मिथूनदा अभिनय क्षेत्रात येण्याआधी नक्षलवादाकडे आकर्षित झाले होते. पण नंतर त्यांनी हा नाद सोडला. पण नक्की काय होता तो किस्सा काय होती ती घटना जाणून घेऊया या लेखातून…

तर, १६ जून १९५० साली जन्म झालेल्या मिथूनदा यांचे खरे नाव गौरंगा चक्रवर्ती. पण नंतर त्यांनी मिथून हे नाव ठेवून घेतले. अनेक तरुणांना जसे वेगवेगळ्या गोष्टी आकर्षित करतात, तसेच मिथूनदांच्या बाबत झाले. वीशीत असताना त्यांनी कम्युनिस्ट पार्टी जॉईन केली आणि ते नक्षलवादी चळवदीत सहभागी झाले. त्यावेळी मिथूनदा यांना नक्षलवादी विचारांनी घेरले होते. इतकंच नाही तर त्यांचे नक्षवादी नेते चारु मुजुमदार आणि रवी रंजन उर्फ भा यांच्याशीही जवळचे संबंध तयार झाले होते. जेव्हा पोलिसांनी पश्चिम बंगालमध्ये नक्षलवादाविरुद्ध कारवाई केली होती. तेव्हा मिथून दा यांना काही दिवसांसाठी लपूनही राहावे लागले होते. पण याचदरम्यान त्यांच्या भावाचा दुर्दैवीरित्या एका अपघातात मृत्यू झाला. त्यामुळे मिथूनदा यांना आपल्या कुटुंबात परत येणे भाग पडले. त्यानंतर त्यांनी नक्षलवाद सोडून दिला आणि आपल्या करियरवर फोकस केला.

पदवीपर्यंतचं शिक्षण घेतलेले मिथून दा पुढे पुण्याला आले आणि त्यांनी फिल्म अँड टेलिव्हिजन इंस्टीट्यूट ऑफ इंडिया म्हणजेच एफटीआयआयमध्ये ऍडमिशन घेतले. येथे आल्यानंतर त्यांचा नक्षलवादी भूतकाळ मागे पडत गेला. पण असे असले तरी मुंबईत करियरसाठी आल्यानंतर त्यांच्या भूतकाळाने लगेचच पाठ सोडली नव्हती. पण हळूहळू मिथूनदांनी त्यांच्या कामातून त्यांची ओळख मिळवली आणि त्यांचा भूतकाळ बराच मागे पडला. मिथूनदा यांना त्यांच्या पहिल्याच मृगया चित्रपटासाठी राष्ट्रीय पुरस्कारही मिळाला. डिस्को डान्सर चित्रपटाने त्यांना डिस्को डान्सरही उपमाही दिली. पण १९८० साली आलेल्या नॅक्सलाईट चित्रपटाने सर्वांना आश्चर्यचकीत केले. ख्वाजा अहमद अब्बास यांच्या या चित्रपटात काम करण्यासाठी त्यांना ऑफर आली होती. पण त्यांनी ती स्विकारण्यास जरा वेळ घेतला होता. कारण त्यांच्यामते या चित्रपटामुळे त्यांच्या नक्षलवादी भूतकाळाच्या आठवणी पुन्हा जाग्या होतील. पण नंतर ते या चित्रपटात काम करण्यासाठी तयार झाले.

मिथूनदा यांनी पुढे अनेक हिट चित्रपटांत काम केले. १९९८-९९ च्या दरम्यान तर एकवेळ तर अशी आली होती, की त्यांचे स्वत:चेच चित्रपटांच्या तारखा क्लॅश होऊ लागल्या होत्या. त्याकाळी ते सर्वाधिक मानधन घेणाऱ्या अभिनेत्यांपैकी एक होते, तसेच सर्वाधिक टॅक्स भरणारेही अभिनेते होते. विशेष म्हणजे विविध भाषांमधील ३५० हून अधिक चित्रपटांत काम केलेल्या मिथून दा यांचे १९९३ ते १९९८ दरम्यान अनेक सिनेमे सलग फ्लॉप ठरले. मात्र, तरीही त्यांचे स्टारडम कमी झाले नव्हते.

एकीकडे मिथून दा अभिनय क्षेत्र गाजवत होते, तर दुसरीकडे त्यांनी राजकिय क्षेत्रात आणि हॉटेल व्ययसायातही प्रवेश केला. त्याचमुळे आजही ते श्रीमंत अभिनेत्यांपैकी एक आहे. त्यांचा हॉटेल व्यायसाय चांगलाच चालू असून अनेक रिपोर्ट्सनुसार २५० कोटींहूनही अधिक त्यांचा नेटवर्थ आहे. त्यांच्याकडे मर्सिडीज, फोर्ड, वोक्सवॅगन अशा आलिशान गाड्याही आहेत. त्यांचे मुंबईत २ बंगले आहेत. याशिवाय त्यांची मोनार्च ग्रुप ऑफ हॉटेलची चैन आहे. अनेक रिपोर्ट्सनुसार त्यांच्याकडे जवळपास ७६ कुत्रे आहेत. जे त्यांच्या बंगल्याचे संरक्षण करत असतात. तसेच त्यांच्यासाठी खास एसी रुम बांधण्यात आली आहे. इतकंच नाही तर श्वानप्रेमी असलेल्या मिथूनदा यांच्याकडे विविध पक्षी देखील असल्याचे सांगितले जाते.

हेही पाहा- असं काय घडलं की मिथूनदा यांनी नक्षलवाद सोडत अभिनयाची वाट धरली?

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा-

हे देखील वाचा