Monday, July 20, 2026
Home टेलिव्हिजन काय सांगता! प्रेक्षकांच्या अल्पप्रतिसादामुळे ‘ही’ मालिका केवळ ३० दिवसातच घेणार प्रेक्षकांचा निरोप

काय सांगता! प्रेक्षकांच्या अल्पप्रतिसादामुळे ‘ही’ मालिका केवळ ३० दिवसातच घेणार प्रेक्षकांचा निरोप

टेलिव्हिजनवर नेहमीच नवनवीन शो सुरु होत असतात आणि जुने बंद होत असतात. काही शो वर्षानुवर्षे चालतात आणि मग बंद होतात. मात्र टीव्हीवर आपण असे देखील शो बघतो जे काही महिन्यातच बंद पडतात. हो बंद होण्यामागे अनेक कारणं असले तरी मुख्य कारण टीआरपीचेच असते. प्रेक्षकांनी एखाद्याला शोला पसंती नाही दिली तर शो बंद होतो. सध्या टेलिव्हिजन विश्वात अशाच एका शोची जोरदार चर्चा सुरु आहे, जो अवघ्या काही दिवसातच बंद झाला.

कलर्स चॅनेलवर मोठ्या जल्लोषात ‘मोलकी- रिश्तों की अग्निपरीक्षा’ हा शो सुरु झाला होता. मागच्याच महिन्यात अर्थात १३ फेब्रुवारी रोजी हा शो सुरु झाला होता. मात्र आता अवघ्या काही दिवसात म्हणजे एका महिन्यात हा शो बंद झाल्याच्या चर्चा जोरदार सुरु आहेत. एका रात्रीत शो बंद झाल्यामुळे शोमधील कलाकार आणि फॅन्स चांगलेच नाराज झाले आहे. प्राप्त होणाऱ्या माहितीनुसार १२ मार्च रोजी शोचा शेवटचा भाग शूट करण्यात आला आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by ColorsTV (@colorstv)

प्राप्त होणाऱ्या माहितीनुसार ‘मोलकी २’ हा शो खराब रेटिंगमुळे बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यासोबतच प्रोग्रामिंग चेंजेस देखील हा शो बंद करण्याचे कारण सांगितले जात आहे. तर चॅनेल आणि प्रोडक्शन हाऊसमध्ये कोणत्यातरी गोष्टीवरून वाद झाल्यामुळे देखील हा निर्णय घेतला गेल्याचे सांगितले जात आहे. सध्या या चॅनेलवर ५ शो चालू असून १ लवकरच सुरु होणार आहे.

‘मोलकी २’मधून आपल्या करिअरची सुरुवात करणाऱ्या विधी शाहने या बातम्यांना दुजोरा दिला असून, तिने सांगितले की, हा तिच्यासाठी छोटा मात्र आनंद देणारा अनुभव होता. या शो मुळे तिला खूप काही शिकायला मिळाले. होळीला त्यांना हा शो बंद होणार असल्याचे सांगितले गेले होते.

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
क्रिकेटर्ससोबत लग्न केल्यानंतर ‘या’ अभिनेत्रींनी ठोकला अभिनयाला रामराम

दिग्गजांविरुद्ध मिटू कॅम्पेनमध्ये उतरणाऱ्या अभिनेत्रीच्या जीवाला धोका, इंस्टाग्राम पोस्ट करून उडवली खळबळ

हे देखील वाचा