Monday, June 24, 2024

बॅकलेस ड्रेस घालून कारमध्ये बसत होती मौनी, ड्रेसने दिला धोका अन् कॅमेऱ्यात कैद झाला अभिनेत्रीचा ‘Oops Moment!’

टेलिव्हिजनची ‘नागिन’ म्हणून प्रसिद्ध झालेली बॉलिवूड अभिनेत्री मौनी रॉय तिच्या हॉट फोटो आणि व्हिडिओंमुळे सोशल मीडियावर अधिराज्य गाजवते. ती सोशल मीडियावर खूप सक्रिय आहे आणि चाहते तिच्या पोस्टची आतुरतेने वाट पाहत असतात. तिची बोल्ड स्टाईल नेहमीच चाहत्यांना घायाळ करते. पण यावेळी तिची बोल्डनेस तिलाच महागात पडलेली पाहायला मिळाली. आज आम्ही तुम्हाला असा व्हिडिओ दाखवणार आहोत, ज्यामध्ये मौनी रॉय तिच्या बोल्ड कपड्यांमुळे उप्स मुमेंटची शिकार होताना दिसत आहे. 

कारमध्ये बसताना ड्रेसने दिला धोका
या व्हिडिओमध्ये मौनी रॉय डिझायनर बॅकलेस ड्रेस घालून मीडियाच्या कॅमेऱ्यांपासून पळताना दिसत आहे. पण कारमध्ये बसताच ती उप्स मुमेंटची शिकार झाली, जे मीडियाच्या कॅमेऱ्यातही कैद झाले आहे. (mouni roy was sitting in the car wearing a backless dress oops moment was recorded in the camera)

कम्फर्टेबल नव्हती मौनी
हा व्हिडिओ काही महिन्यांपूर्वीचा आहे. आपण पाहू शकतो की, व्हिडिओमध्ये मौनी रॉय तिच्या चाहत्यांच्या समोर येते. इतकेच नव्हे, तर ती पॅपराजींसाठी पोझही देताना दिसत आहे. हा व्हायरल व्हिडिओ पाहून सहज लक्षात येते की, मौनी रॉय या आउटफिटमध्ये थोडीही कम्फर्टेबल नव्हती. अभिनेत्रीच्या या व्हिडिओवर अनेकांनी तिला ट्रोल केले आहे. असा आऊटफिट परिधान केल्याबद्दल नेटकऱ्यांनी तिला बरेच खरे खोटे सुनावले आहे.

‘या’ चित्रपटात दिसणार मौनी रॉय
वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले, तर मौनी रॉयने अनेक टेलिव्हिजन शोमध्ये दीर्घकाळ काम केले आहे आणि आता ती मोठ्या पडद्यावर लक्ष केंद्रित करत आहे. गेल्या काही वर्षांत तिने अनेक बड्या स्टार्ससोबत चित्रपट केले आहेत. आता ती बॉलिवूडच्या बहुप्रतिक्षित ‘ब्रह्मास्त्र’ चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटात रणबीर कपूर, आलिया भट्ट आणि अमिताभ बच्चन देखील दिसणार आहेत.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-‘मी या चित्रपटासाठी आपले रक्त दिलंय’, म्हणत शाहिदने सांगितला ‘जर्सी’ चित्रपटादरम्यानचा वाईट किस्सा

-नेपोटिझमबाबत आयुष शर्माने मांडले मत; सलमान, शाहरुखचा उल्लेख करत म्हणाला, ‘प्रत्येक अभिनेता स्वार्थी…’

-काय सांगता! जॅकलिन फर्नांडिस आहे २०० कोटींच्या मनी लाँड्रिंग प्रकरणातील आरोपीसोबत रिलेशनशिपमध्ये?

हे देखील वाचा