Wednesday, April 17, 2024

मंडळी तयार व्हा! मार्चमध्ये ‘हे’ सहा चित्रपट ऍमझोन प्राईमवर येतायत आपल्या भेटीला

मागच्या वर्षीपासून बऱ्याच गोष्टी बदलल्या आहेत. कोरोनाच्या काळात मनोरंजनाच्या पद्धती देखील बदलल्या आहेत. प्रेक्षक चित्रपटगृहात जाण्याऐवजी घरात बसूनच चित्रपट बघण्यास प्राधान्य देताना दिसत आहेत. त्यामुळे अॅमझोन प्राईमवर अनेक चित्रपट प्रदर्शित होताना दिसत आहेत. यावर देश विदेशातील अनेक चित्रपट आणि वेब सीरिज प्रदर्शित झाल्या आहेत. मार्चमध्ये देखील या प्लॅटफॉर्मवर अनेक नवीन चित्रपट रिलीज होणार आहेत. ज्याचा आनंद सगळेजण घर बसल्या घेऊ शकतात, तर जाणून घेऊया या चित्रपटांबद्दल

त्रिपल एक्स: रिटर्न ऑन जेंडर केज हा चित्रपट तीन वर्षापूर्वी रिलीज झाला होता. अभिनेता विन डीजल सोबत दीपिका पादुकोण हीचा अभिनय प्रेक्षकांना खूपच भावाला होता. त्या दोघांची केमिस्ट्री देखील प्रेक्षकांना खूपच आवडली होती. या चित्रपटात त्या दोघानी अनेक ऍक्शन सीन देखील दिले आहेत. हा चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्मवर 15 मार्चला दाखवला जाणार आहे.

‘बेवॉच’ हा चित्रपट 15 मार्चला ओटीटी प्लॅटफॉर्मवर दाखवला जाणार आहे. या चित्रपटाला देखील प्रदर्शित होऊन जवळपास तीन वर्ष उलटून गेले आहेत. या चित्रपटात बॉलिवूड अभिनेत्री प्रियंका चोप्रा दिसणार आहे. यामध्ये तिने खलनायकाची भूमिका निभावली आहे. डवेन जॉन्सन, जॅक एफ्रोन, अलेक्झांडर डेडरियो हे देखील या चित्रपटात असणार आहेत. या कहाणीमध्ये समुद्र किनाऱ्यावर राखण करणारी टीम आहे. यामध्ये प्रियंका चोप्रा हिने खूपच चांगली अक्टिंग केली आहे.

‘कमिंग 2 अमेरिका’ 1985 मध्ये आलेल्या कमिंग टू अमेरिका याचा सिक्वेल आहे, जो अमेझॉन प्राईम व्हिडिओवर 5 मार्चला प्रदर्शित होणार आहे. हा एक विनोदी चित्रपट आहे. यामध्ये ‘एडी मर्फी’ याने अभिनय केला आहे. या चित्रपटात दाखवले आहे की, ‘अफ्रिकी सम्राट अकिम’ आपल्या हरवलेल्या मुलाला शोधण्यासाठी कसा अमेरिकाला जातो.

मेकिंग देअर मार्क हा एक खेळाशी संबंधित चित्रपट आहे. खेळ प्रेमी असणाऱ्या प्रेक्षकांसाठी हा चित्रपट 12 मार्चला ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज होणार आहे.

इन्विसिबल हा चित्रपट 26 मार्च रोजी अमेझॉन प्राईम व्हिडिओवर रिलीज होणार आहे. हा चित्रपट मार्क नावाच्या एका मुलाची कहाणी आहे, ज्याचे वडील एक सुपरहिरो आहेत.

ल टेम्प्लांजा ही सीरिज 26 मार्चला ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज होणार आहे. मौरो लारेया आणि सोलेदाड यांच्यावर आधारित कहाणी आहे. या सीरिजमध्ये दाखवले आहे की, कसे ते साम्राज्य कमवतात, आणि कसे एका दिवसातच ते गमावतात.

हे देखील वाचा