Friday, September 20, 2024
Home बॉलीवूड रामाच्या भूमिकेसाठी रणबीर कपूरच का ? मुकेश छाब्रा यांनी दिले उत्तर…

रामाच्या भूमिकेसाठी रणबीर कपूरच का ? मुकेश छाब्रा यांनी दिले उत्तर…

रणबीर कपूर अभिनित ‘रामायण’ हा बहुप्रतिक्षित चित्रपटांपैकी एक आहे. नितेश तिवारी यांच्या दिग्दर्शनाखाली बनत असलेल्या या चित्रपटाची सर्वजण आतुरतेने वाट पाहत आहेत. या चित्रपटाची अधिकृत घोषणा अद्याप झालेली नाही. नितेश तिवारी दिग्दर्शित या चित्रपटात रणबीर भगवान रामाची भूमिका साकारणार आहे. साई पल्लवी सीतेच्या भूमिकेत दिसणार आहे. अलीकडेच कास्टिंग डायरेक्टर मुकेश छाब्रा यांनी रणबीर कपूरला या चित्रपटात भगवान राम म्हणून निवडण्यामागचे कारण स्पष्ट केले आहे.

मुकेश छाब्रा  यांनी एका पॉडकास्ट दरम्यान, नितीश तिवारी यांच्या रामायणात भगवान रामाच्या भूमिकेसाठी रणबीर कपूरची निवड का करण्यात आली आहे हे स्पष्ट केले. छाब्रा यांनी सांगितले की, ‘त्याच्या चेहऱ्यावर एक शांतता दिसते. चित्रपटात तेच हवे होते. नितेश तिवारी यांनी त्याच्याबद्दल खूप आधी विचार केला होता. हा अतिशय योग्य निर्णय आहे. हे चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर कळेलच.

चित्रपटाच्या सेटवरील चित्रे लीक होऊ नयेत यासाठी रामायणच्या निर्मात्यांनी सेटला सर्व बाजूंनी कव्हर केले आहे. रिपोर्ट्सनुसार हा प्लान निर्माता नमित मल्होत्रा ​​यांनी बनवला आहे. अधिकृत घोषणेपूर्वी चित्रपटाची कोणतीही झलक समोर यावी असे त्याला वाटत नव्हते. यामध्ये सेटवर नो-फोन पॉलिसीचा पर्याय देखील समाविष्ट आहे. चित्रपटाची एकही झलक लीक होऊ नये यासाठी विशेष पाळत ठेवण्यात आली आहे.

चित्रपटातील पौराणिक जग जिवंत करण्यासाठी दिग्दर्शक कोणतीही कसर सोडत नाहीयेत. बजेटच्या बाबतीत हा आतापर्यंतचा सर्वात मोठा चित्रपट ठरू शकतो. अरुण गोविल नितेश तिवारीच्या ‘रामायण’मध्ये राजा दशरथची भूमिका साकारताना दिसणार आहे. याशिवाय अभिनेत्री लारा दत्ता देखील या चित्रपटाचा एक भाग आहे. या चित्रपटात ती कैकेयीची भूमिका साकारणार आहे.

नितेश तिवारीच्या ‘रामायण’ या चित्रपटाची सुरुवातीपासूनच प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहेत. ‘चित्रपटाच्या रिलीजबाबत अद्याप कोणताही खुलासा झालेला नाही. पण, हा चित्रपट २०२७ मध्ये चित्रपटगृहात येऊ शकतो.

दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा 

हेही वाचा –

लग्नानंतर सोनाक्षी सिंहली करायला लागतोय आर्थिक तंगीचा सामना? अभिनेत्री विकणार वांद्रे अपार्टमेंट

मलाईकाने शेयर केले तिचे महिन्याचे वेळापत्रक; ब्रेकअप नंतर अशी सावरतेय स्वतःला…

 

author avatar
Tejswini Patil

हे देखील वाचा