Tuesday, March 5, 2024

किंग खान शाहरुख कसा बनला बॉलिवूडचा ‘बादशाह’? संगीतकार अनु मलिक यांनी सांगितला रंजक किस्सा

2023 मध्ये एकामागून एक हिट चित्रपट देणारा स्टार शाहरुख खान (Shahrukh Khan) सतत चर्चेत असतो. बॉलीवूडमधील प्रत्येकाची त्यांच्याशी निगडित काहीतरी कहाणी नक्कीच आहे. अलीकडेच एका मुलाखतीदरम्यान चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध संगीतकार अनु मलिक (Anu malik)यांनी शाहरुख खानबद्दल मीडियाशी मनमोकळेपणाने संवाद साधला. त्यांनी 25 वर्ष जुना किस्सा मीडियासोबत शेअर केला.

अनु मलिक आणि शाहरुख खान यांनी अनेक चित्रपटांमध्ये एकत्र काम केले आहे. अलीकडेच एका मुलाखतीदरम्यान संगीतकार म्हणाला, ‘बादशाह’ चित्रपटाचे संगीत मी दिग्दर्शित करत होतो. शाहरुख आणि मी एकाच चित्रपटाच्या शूटिंगसाठी विमानाने कुठेतरी जात होतो. त्या प्रवासात मी ‘बादशाह ओ बादशाह’ गाण्याची धून फ्लाइटमध्ये शाहरुख खानला वेगवेगळ्या शब्दात गुंजवली होती. शाहरुखला बादशाह हा शब्द ऐकताच तो सुराच्या प्रेमात पडला. नंतर हेच गाणे ‘बादशाह’ चित्रपटाचे टायटल ट्रॅक बनले आणि त्याच गाण्यानंतर लोक शाहरुख खानला ‘बादशाह’ नावाने हाक मारायला लागले.

शाहरुख खान आणि ट्विंकल खन्ना यांचा ‘बादशाह’ चित्रपट रिलीज होऊन 25 वर्षे झाली आहेत, पण तरीही प्रेक्षकांना हा चित्रपट खूप आवडतो. या चित्रपटातील शाहरुख आणि ट्विंकलची केमिस्ट्री प्रेक्षकांना आवडली. कॉमेडी आणि रोमान्सने भरलेल्या या चित्रपटात शाहरुख खान वेगळ्या अंदाजात दिसला. ‘बादशाह’ चित्रपटातील गाणी आजही श्रोत्यांना खूप आवडतात.

अनु मलिक गेल्या अनेक वर्षांपासून बॉलिवूडमध्ये सक्रिय आहे. त्यांनी अनेक हिट चित्रपटांना संगीत दिले आहे. गेल्या वेळी त्यांनी ‘सेल्फी’ चित्रपटासाठी संगीत दिग्दर्शन केले होते. या चित्रपटातील त्यांचे काम लोकांना खूप आवडले.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा-

लता मंगेशकर यांच्या असामान्य कर्तृत्वाची साक्ष देणारे ‘हे’ आहेत त्यांना मिळालेले सर्वोच्च पुरस्कार
एकमेकांना भाऊ- बहीण मानणाऱ्या लता मंगेशकर आणि दिलीप कुमारांमध्ये ‘या’ कारणाने आला होता दुरावा, 13 वर्षे…

हे देखील वाचा